10 राज्यांत विधानसभेच्या 54 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; मध्य प्रदेशच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष

देशातील 10 राज्यांमध्ये विधानसभेच्या 54 जागांसाठी मंगळवारी (3 नोव्हेंबर) पोटनिवडणुका पार पडल्या. मध्य प्रदेश 28, गुजरात 8 आणि उत्तर प्रदेशमधील 7 जागांसाठी मतदान झाले.

10 राज्यांत विधानसभेच्या 54 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण; मध्य प्रदेशच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 11:05 PM

नवी दिल्ली : देशातील 10 राज्यांमध्ये विधानसभेच्या 54 जागांसाठी मंगळवारी (3 नोव्हेंबर) पोटनिवडणुका पार पडल्या. मध्य प्रदेश 28, गुजरात 8 आणि उत्तर प्रदेशमधील 7 जागांसाठी मतदान झाले. ओडिशा, नागालँड, कर्नाटक आणि झारखंडमध्येही प्रत्येकी 2 जागांसाठी मतदान झाले. तर छत्तीसगड, तेलंगाना आणि हरियाणा या राज्यांतसुद्धा प्रत्येकी एका जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. (Voting process completed for 54 Assembly seats in 10 states)

कुठे? किती मतदान ?

देशातील 10 राज्यांत पोटनिवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या राज्यांत किती मतदान झाले, याची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, छत्तीसगड- 71.99 टक्के, गुजरात-57.98 टक्के, हरियाणा- 68 टक्के, झारखंड- 65.51 टक्के, मध्य प्रदेश- 66.37 टक्के, नागालँड- 83.69 टक्के, ओडिशा- 68.08 टक्के, तेलंगाना- 81.44 टक्के आणि उत्तर प्रदेशात एकूण 51.57 टक्के मतदान झाले.

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांना विशेष महत्त्व

मध्य प्रदेशमध्ये  28 जागांसाठीच्या पोटनिवडणुकांना विशेष महत्त्व आहे. कारण याच निवडणुकांच्या निकालावरुन विद्यमान मुख्यमंत्री शिवराचसिंह चौहान यांच्या सरकारचं भवितव्य ठऱणार आहे. मध्य प्रदेशात एकूण 28 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत तब्बल 25 आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर या सर्व जागा रिक्त होत्या. त्यानंतर पक्षांतर केल्यामुळे 25 आणि इतर 3 अशा एकूण 28 जागांवर आज मतदान झाले.

मध्य प्रदेशात एकूण 28 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. मध्य प्रदेश विधानसभेत सध्या भाजपकडे 107 आमदारांचं संख्याबळ आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी 9 जागांची गरज आहे. तर, काँग्रेसला पुन्हा सत्ता काबीज करायची असेल तर सर्वच्या सर्व म्हणचेच 28 जागांवर विजय मिळवावा लागेल. दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेशात सत्तेची फळं चाखण्याची संधी पुन्हा मिळू शकते का? हे मतमोजणीनंतरच समजू शकेल.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात जागांसाठी मतदान झाले. यावेळी 88 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालं आहे.

संबंधित बातम्या :

कमलनाथ काँग्रेसचे स्टार प्रचारकच राहणार!, निवडणूक आयोगाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

‘त्या’ वक्तव्यावरुन राहुल गांधींनी कमलनाथांना जाहीरपणे फटकारले, म्हणाले…

‘अहंकारी नेत्याला धडा शिकवण्याची वेळ’, ज्योतिरादित्य शिंदे यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल

(Voting process completed for 54 Assembly seats in 10 states)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.