AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंगणघाटच्या पीडितेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून, आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

हिंगणघाट येथील पीडित तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केला जाणार (Wardha Hinganghat teacher burnt case) आहे.

हिंगणघाटच्या पीडितेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून, आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
| Updated on: Feb 04, 2020 | 5:53 PM
Share

वर्धा : हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात (Wardha Hinganghat teacher burnt case) आला. या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या प्रकरणी आरोपी विकी नगराळे याला अटक करण्यात आली असून त्याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.

आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी 

आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला आज (4 फेब्रुवारी) न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी आरोपीचा पाच दिवसांचा रिमांड मागितला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. परिसरात तणावाचं वातावरण असल्याने पोलिसांनी गुप्तरित्या आरोपीला न्यायालयात हजर करत तातडीने रवानाही केलं.

या प्रकरणातील आरोपीकडून मोटारसायकल, मोबाईल फोन, कपडे तसंच इतर पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. या तपासात कोणतीही चूक होऊ नये, याचीही दक्षता बाळगण्यात येत आहे. या गुन्ह्याचा तपासही उपविभागीय दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात येणार (Wardha Hinganghat teacher burnt case) आहे.

पीडितेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून

हिंगणघाट येथील पीडित तरुणीच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केला जाणार आहे. नुकतंच याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

तसेच या प्रकरणी दोषीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या पीडितेव तरुणीवर योग्य ते उपचार करावेत, या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

पीडितेला न्याय देण्यासाठी ‘हिंगणघाट बंद’ची हाक

पीडितेला न्याय देण्याच्या मागणीसाठी हिंगणघाट शहरातील मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, अशी मागणी सामान्यांकडून होत आहे. लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही ‘हिंगणघाट बंद’मध्ये सहभागी झाले होते.

पीडितेला न्याय द्या, ज्याप्रमाणे पीडितेला जाळण्यात आलं, तसंच आरोपीलाही जाळा, अशी मागणी काही संतप्त नागरिकांनी केली. नराधम आरोपीचा एन्काऊण्टर करा किंवा त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी प्रामुख्याने मोर्चात करण्यात आली. सर्वपक्षीयांनी ‘हिंगणघाट बंद’ची हाक दिल्यानंतर चौकाचौकातील दुकानं बंद करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरुन मोर्चात सहभाग (Wardha Hinganghat teacher burnt case) नोंदवला.

संबंधित बातम्या : 

हिंगणघाटच्या हैवानाचा एन्काऊण्टर करा, जनसमुदाय उत्स्फूर्तपणे रस्त्यावर, पीडितेसाठी 72 तास महत्त्वाचे

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.