यवतमाळमध्ये कोरोनाचा विळखा वाढला, 24 तासात 27 नवे रुग्ण

यवतमाळमध्ये काल 20 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते, तर रविवारी सकाळी 7 नवे रुग्ण सापडले. (Yawatmal Corona Patient Increase)

यवतमाळमध्ये कोरोनाचा विळखा वाढला, 24 तासात 27 नवे रुग्ण

यवतमाळ : यवतमाळमध्येही कोरोनाचा विळखा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. आजच्या दिवसात आणखी सात जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 51 वर पोहोचली आहे. (Yawatmal Corona Patient Increase)

यवतमाळमध्ये काल 20 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. काल दुपारपर्यंत 16, तर संध्याकाळी आणखी 4 रुग्ण सापडले. या 20 रुग्णांपैकी 19 रुग्ण आधीपासून विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली होते. कालच्या दिवसात सापडलेले 20 रुग्ण पवार पुरा इंदिरा नगर भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत.

रविवारी सकाळी 7 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे गेल्या 24 तासात सापडलेल्या ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची संख्या 27 झाली. एकूण 27 जणांमध्ये 14 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा : कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात तब्बल 811 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 7,628 वर

यवतमाळमध्ये सापडलेल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 51 झाला आहे. त्यापैकी दहा जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. जिल्ह्यात एकूण अॅक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 41 इतकी आहे.

महाराष्ट्रात काल कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे 811 नवे रुग्ण सापडले. मुंबईतही सर्वाधिक 602 नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात काल 22 रुग्ण दगावले, तर एकूण 323 जणांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 हजार 628 वरगेला आहे. मुंबईत 5049 रुग्ण असून आतापर्यंत एकूण 191 ‘कोरोना’बळी गेले आहेत.

(Yawatmal Corona Patient Increase)

Published On - 11:00 am, Sun, 26 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI