AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नगरसेवक हरवले, आता आजारात सोडलं, तसं आम्ही मतदान करताना सोडणार’, पुण्यात युवक काँग्रेसची बॅनरबाजी

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आपल्या वार्डाचे नगरसेवक मदतीसाठी फिरकतही नसल्याने पुण्यातील नागरिक संतप्त झाल्याचं दिसत आहेत (Banners of missing corporator).

'नगरसेवक हरवले, आता आजारात सोडलं, तसं आम्ही मतदान करताना सोडणार', पुण्यात युवक काँग्रेसची बॅनरबाजी
| Updated on: Jul 24, 2020 | 8:33 AM
Share

पुणे : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाची चांगलीच चिंता वाढली आहे. त्यातच संसर्ग वाढत असताना आपल्या वार्डात निवडणुकीत निवडून दिलेले नगरसेवक फिरकतही नसल्याने पुण्यातील नागरिक संतप्त झाल्यांच पाहायला मिळत आहे (Banners of missing corporator in Pune). हीच भावना ओळखून पुणे युवक काँग्रेसने पुण्यातील रामवाडी परिसरात जोरदार बॅनरबाजी केली आहे. यावर ‘नगरसेवक हरवले, आता आजारात सोडलं, तसं आम्ही मतदान करताना सोडणार’ असं लिहिलं आहे. यातून गायब नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा संदेश देण्यात आला.

कोरोना संसर्गाने सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी आणि सेलिब्रेटिंनाही वेढा घातला आहे. पुण्यातही महापौरांपासून अनेक नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक नगरसेवकांनी घरातच थांबणं पसंत केलेलं दिसत आहे. खबरदारी म्हणून नगरसेवकांनी हा मार्ग अवलंबलेला असला तरी नागरिकांची मात्र गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत असली, तरी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून यंत्रणेस सहकार्य केले जात नसल्याने नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहेत. यंत्रणेला सहकार्य तर सोडाच, परंतु कोणी याबाबत विचारपूसही करीत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पुण्यातील अनेक भागात आरोग्य सुविधा आणि इतर प्रश्नांवर नगरसेवकांनी आवाज उठवावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक नगरसेवक बाहेर पडणं टाळत आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. हीच भावना ओळखून पुणे युवक काँग्रेसने पुण्यातील रामवाडी परिसरात बॅनरबाजी करत नागरिकांच्या संतापाला वाट मोकळी करुन दिली आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

युवक काँग्रेसने केलेल्या बॅनरबाजीत आता नागरिकांच्या गरजेच्या वेळी गैरहजर आणि बेपत्ता असणाऱ्या नगरसेवकांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तुम्ही आता साथीरोगाच्या काळात जसे आम्हाला सोडलं, तसंच आम्हीही निवडणुकीत मतदाना करताना तुम्हाला सोडणार आहोत, असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे.

हेही वाचा :

Pune Lockdown | पुणेकरांचा लॉकडाऊन संपला, पूर्वीच्या निर्बंधांसह नवे नियम जाहीर

नागपूरकरांना दोन-तीन दिवसांची मुदत, अन्यथा कडक लॉकडाऊन, तुकाराम मुंढेंचा इशारा

Banners of missing corporater in Pune

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.