विमानात मिळणाऱ्या या 5 गोष्टी ज्या तुम्ही घरी घेऊन येऊ शकता… कमी लोकांना हे माहित नसेल
विमान प्रवासासाठी काही नियम हे आखून दिलेले असतात. ते नियम पाळणे हे गरजेचेच असतात. पण तुम्हाला काय माहित आहे की विमान प्रवासात काही गोष्टी तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. तेही कोणत्याही विना रोक-टोक. त्या कोणत्या वस्तू आहेत जाणून घेऊयात.

airplane freebiesImage Credit source: TV9 Marathi
विमान प्रवासासाठी काही नियम हे आखून दिलेले असतात. ते नियम पाळणे हे गरजेचेच असतात. पण तुम्हाला काय माहित आहे की विमान प्रवासात काही गोष्टी तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. तेही कोणत्याही विना रोक-टोक.
- जाणून घ्या अशा कोणत्या वस्तू आहेत…
- विमानात मिळणारे हेडफोन सामान्यतः स्वस्त आणि साधे असतात. पण विमान कंपन्या त्यांचा पुनर्वापर करत नाहीत, त्यामुळे तुम्ही ते घरी घेऊ शकता.
- जर ब्लँकेट आणि उशी योग्य पॅकिंगमध्ये दिली गेली असेल (विशेषतः आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये). तर ती तुमची मालमत्ता होते. अनेकजण त्यांना ट्रॅव्हल किटमध्ये सामील करतात.
- विमानात मिळणारे बिस्किटे, ड्राय फ्रूट्स किंवा चॉकलेट्स, जर उरले असतील तर तुम्ही ते घेऊ शकता. हे तुमच्या तिकिटाचाच तो एक भाग असतो. त्यासाठी कोणीही अडवणार नाही.
- आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या डिझायनर मासिके आणि मेन्यू कार्ड्स आकर्षक असतात. त्यावर तुमचे नाव लिहिलेले नसते, पण घरी प्रदर्शनासाठी ते पुरेसे असतात. तुम्ही त्यांनाही घरी नेऊ शकता.
- या छोट्या-छोट्या वस्तू तुम्ही सहज तुमच्या बॅगेत ठेवू शकता. या एकदाच वापरासाठी असतात आणि विमान कंपन्या त्यांची परतफेड मागत नाहीत.
- लक्षात ठेवा, विमानातून फक्त स्वच्छ आणि वापरात न आलेल्या वस्तूच घेता येतात. ब्लँकेट किंवा उशी उघडी असल्यास ती तिथेच सोडणे चांगले. विमानातील कर्मचारी सर्वकाही लक्षात ठेवतात, पण ज्या वस्तू घेण्यास योग्य असतात, त्याबद्दल ते स्वतः काही बोलत नाहीत.
