AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमाच्या जोरावर उभी केली 50 हजार कोटींची कंपनी, गर्लफ्रेंडला दिले यशाचे श्रेय

यश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण या यशामागे कोणीतरी असतं ते आपल्याला मदत करत असतं. यश मिळवायचं असेल तर निस्वार्थ मदत करणारा कोणी तरी हवा असतो. कारण तोच आपल्याला मोटिव्हेट करत असतो. पुढे जाण्यासाठी सहकार्य करत असतो. अशा वेळी जोडीदारापेक्षा अजून चांगला व्यक्ती कोण असू शकतो.

प्रेमाच्या जोरावर उभी केली 50 हजार कोटींची कंपनी, गर्लफ्रेंडला दिले यशाचे श्रेय
nitin kamath
| Updated on: Dec 09, 2023 | 6:01 PM
Share

Nithin Kamath success Story : व्यवसाय किंवा करिअरमध्ये जर प्रगती करायची असेल तर परिश्रम करावे लागतात. चौकटीच्या बाहेर विचार करावा लागतो. जेणेकरुन काहीतरी नवीन करता येते. देशातील सर्वात मोठे ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Zerodha चे CEO आणि सह-संस्थापक नितीन कामत यांची सक्सेस स्टोरी आज आपण पाहणार आहोत. ज्यांनी व्यवसायात प्रगती तर केलीच पण अफाट पैसा देखील कमवला. त्यांनी आज 50 हजार कोटींची कंपनी तयार केली आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केली प्रेमकहाणी

नितीन कामत यांनी त्यांची प्रेमकहाणी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 20 वर्षांपूर्वी त्यांची भेट सीमा पाटील यांच्यासोबत झाली होती. त्या  एका कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या. येथेच रात्रीच्या शिफ्टमध्ये त्यांची भेट झाली आणि पुढे दोघे लग्नाच्या बंधनात अडकले.

नितीन कामत सांगतात की, आज याच नातेसंबंधामुळे आपणि जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे त्यांनी यश मिळवले आणि कॉल सेंटरच्या नोकरीपासून ते 50 हजार कोटी रुपयांच्या कंपनीपर्यंतचा प्रवास केला.

नितीन कामत यांनी म्हटले की, कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. त्यामुळे सामंजस्यानेच नाते दृढ आणि अतूट होते. पण अनेकवेळा किरकोळ मतभेदांमुळे लोक नातं तोडतात.

दीर्घकालीन नातेसंबंधांचे महत्त्व

त्यांनी लिहिले आहे की, लोकं आता दीर्घकालीन नातेसंबंधांचे महत्त्व विसरले आहेत. जे वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे.

नितीन कामत यांच्या मताशी तुम्ही देखील सहमत असाल. ते म्हणतात की किरकोळ नाराजीमुळे नाते तोडून दुसऱ्यासोबत जगण्याचा निर्णय घेण्यापेक्षा तडजोड करुन त्याच जोडीदारासोबत राहा. कारण आपल्याला एकमेकांच्या गरजा आणि इच्छा कळालेल्या असतात. ते जर समजून घेतल्या तर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जोडीदार बदलून स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. उलट काहीवेळा अडथळे निर्माण होतात.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.