AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गल्ली ते दिल्ली… आख्खा देश होरपळणार, महाराष्ट्राच्या या भागासह अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार

IMD Weather Update : 24 मे रोजी देशातील काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त होणार आहेत, तर काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गल्ली ते दिल्ली... आख्खा देश होरपळणार, महाराष्ट्राच्या या भागासह अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार
Heat wave alert by IMDImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 23, 2026 | 10:41 PM
Share

देशाच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. अशातच रविवारी देशातील विविध भागांमध्ये मिश्र हवामान जाणवणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी देशातील काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त होणार आहेत, तर काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत तापमान आणि पावसाचा असमतोल पॅटर्न अनेक राज्यांमध्ये कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या भागातील हवामान लक्षात घेऊन काळजी घ्यावी आणि दुपारच्या वेळेत अनावश्यकपणे बाहेर पडणे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. देशाच्या कोणत्या राज्यात हवामान कसे असेल ते जाणून घेऊयात.

उत्तर भारत होरपळणार

उत्तर-पश्चिम भारतातील दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते आणि तापमान 44 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. राजस्थानच्या पश्चिम भागात गरम आणि कोरडे वारे वाहणार असल्याने परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते. राजधानी दिल्ली-एनसीआरमध्येही उकाडा आणि गरम वाऱ्यांमुळे नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी, असा इशारा IMD ने दिला आहे.

मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये उष्णतेचा तडाखा बसणार

मध्य भारत आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्येही हवामान गरम आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. दिवसभर तीव्र उन्हासह गरम वारे वाहणार असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. गुजरातमधील काही भागांमध्येही उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. काही ठिकाणी आंशिक ढगाळ वातावरण असू शकते, मात्र त्यामुळे तापमानात विशेष घट होण्याची शक्यता कमी आहे.

आसाम-मेघालयात पावसाची शक्यता

पूर्व आणि ईशान्य भारतात हवामानाचा अंदाज थोडा वेगळा आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडच्या काही भागांमध्ये संध्याकाळी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात. या पावसामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळेल, मात्र हवेत आर्द्रता कायम राहू शकते. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनासारख्या परिस्थितीबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

केरळ, तामिळनाडूमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता

दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हवामान सामान्य ते आर्द्र राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागांमध्ये ढगांची वर्दळ आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, ज्यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळेल. हवामान विभागाने देशभरातील नागरिकांना नियमित हवामान अपडेट्स पाहण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा आणि उष्णता तसेच पावसाच्या बदलत्या परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ