AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळाला झोपवताना…. आईच्या एका सवयीमुळे अन् निष्काळजीपणाने बाळाला होऊ शकतो कॅन्सर; बहुतेक महिला ही चूक करतात

स्तनपानवेळी किंवा बाळाला झोपवताना अनेक महिला ही एक चूक अशी करतात ज्यामुळे बाळाला कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. आणि बहुतेक महिलांना ही सवय असते. ही सवय बाळासाठी धोकादायक असू शकते.

बाळाला झोपवताना.... आईच्या एका सवयीमुळे अन् निष्काळजीपणाने बाळाला होऊ शकतो कॅन्सर; बहुतेक महिला ही चूक करतात
mother use of a phone while breastfeeding or putting her baby to sleep can be frightening for the babyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2025 | 1:36 PM
Share

कॅन्सर हा आजार असा आहे ज्याचे नाव ऐकताच काही जण डिप्रेशनमध्येही जातात. आता या आजारावर ट्रीटमेंट असल्या तरी देखील हा आजार पूर्णपणे बरा होईलच असं नाही. अनेकांना या आजारातून बरं होतानाही अनेक त्रासातून जावं लागतं. आणि हा आजार फक्त मोठ्यांनाच होतो असं नाही तर लहान मुलांमध्ये देखील दिसत आहे. पण अनेकदा आईच्या एका चुकीच्या सवयीमुळे बाळाला देखील या आजाराचा धोका संभवतो. त्यामुळे तुम्ही पण हीच चूक करत असाल तर आताच थांबा.

बहुतेक महिला ही चूक करत आहेत

कारण बहुतेक महिला ही चूक करत आहेत त्यामुळे बाळाच्या मेंदूच्या विकासावर आणि एकूण वाढीवर खूप नकारात्मक परिणाम होत आहे. ही सवय म्हणजे सतत फोन वापरत राहणे. हो, जर तुम्हीही मुलाला झोपवताना, त्याला दूध पाजताना किंवा त्याच्या जवळ असताना फोनवर व्यस्त असाल तर लहान बाळाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. एका प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञांनी देखील याबबत असा दावा केला आहे.

मुलांजवळ फोन वापरणे धोकादायक का आहे?

फोनमधून निघणारी उष्णता आणि रेडिएशन लहान बाळांसाठी खूप धोकादायक ठरतात. जर आई स्तनपान करताना किंवा मुलांना झोपवताना वारंवार फोन वापरत असेल किंवा फोन हातात घेऊन असेल तर त्यातून निघणारे विषारी रेडिएशन बाळाच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर परिणाम करू शकतात. मुलांची त्वचा, हाडे आणि स्नायू प्रौढांपेक्षा खूपच मऊ आणि पातळ असतात, त्यामुळे हे रेडिएशन त्यांच्यापर्यंत तिप्पट वेगाने पोहोचते.

दोन वर्ष विशेषतः काळजी घ्या

डॉक्टर म्हणतात की बाळाचा मेंदूचा किंवा शारीरिक विकास, पहिल्या दोन वर्षात सर्वाधिक होतो. म्हणून, तुम्ही किमान दोन वर्ष बाळाची अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे.

भविष्यात अनेक आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो 

लहान बाळाला लहानपणीच जास्त रेडिएशनच्या संपर्कात आणल्याने मोठे होताना त्यांच्यात गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळे मेंदूचा विकास मंदावतो, झोपेत व्यत्यय येतो, रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आणि अतिफोनच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

ही सवय आईसाठीही धोकादायक आहे

बऱ्याचदा, महिला स्तनपान करताना किंवा बाळांना झोपवताना सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात करतात. त्यांना वाटते की ते त्यांचा वेळ हुशारीने वापरत आहेत. पण डॉक्टर म्हणतात की ही सवय बाळाप्रमाणे आईसाठी देखील तितकीच धोकादायक आहे. ज्यामुळे चिडचिडेपणा आणि हार्मोनल समस्या उद्भवू शकतात. त्या दरम्यान आईच्या शरीराला देखील आरामाची गरज असते.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......