AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब होतील; फक्त करा हे काम

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे तुमचा चेहरा निस्तेज दिसू शकतो. तणाव आणि आजारपण यांसारख्या अनेक कारणांमुळे ही काळी वर्तुळे तयार होतात. या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवण्यासाठी डोळ्यांखालील क्रीम आणि पॅचेस लावण्यासोबतच या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब होतील; फक्त करा हे काम
Dark Circles
| Edited By: | Updated on: Apr 13, 2026 | 3:14 PM
Share

वाढत्या कामाचा ताण, अपुरी झोप तसेच बदलती जीवनशैली यामुळे आरोग्याच्या समस्या तर निर्माण होतात त्यासोबतच डोळ्यांखालील काळे वर्तुळे देखील तयार होतात. डोळ्यांखालील काळी वर्तुळे ज्यांना पेरिऑर्बिटल हायपरपिगमेंटेशन (POH) असेही म्हणतात. काळी वर्तुळे कोणत्याही वयात येऊ शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करतात कारण ते खूप प्रभावीपणे काम करतात. यासोबतच बाजारात असंख्य सीरम आणि क्रीम्स देखील उपलब्ध आहेत, परंतु हे उपाय तेव्हाच प्रभावी ठरतील जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनशैलीत सुधारणा कराल.

काळी वर्तुळे म्हणजे पापण्यांच्या वर आणि डोळ्यांखालील त्वचेचा काळपटपणा, किंवा पिगमेंटेशन.काही लोकांना वाढत्या वयानुसार हे होऊ लागते, तर काहींना लहान वयातच याचा अनुभव येतो. चला या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळवण्यासाठी उपायांसोबतच कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊयात.

झोप सुधारा

तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील, तर बाह्य उपचारांसोबतच तुमच्या शरीरातील अंतर्गत चक्र सुधारणे महत्त्वाचे आहे. यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहत असाल, तर ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा. रात्री किमान 10 वाजेपर्यंत झोपा आणि दररोज 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्या. यामुळे तुमचा तणावही कमी होईल. खरं तर काळी वर्तुळे निर्माण होण्यामागे तणाव हे एक कारण असते.

स्क्रीन टाइम कमी करा

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचे एक कारण म्हणजे फोन किंवा इतर कोणत्याही स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे. तुम्हीसुद्धा स्क्रीनवर खूप वेळ घालवता का? हे कमी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला स्क्रीनवर काम करणे आवश्यकच असेल तर झोपण्याच्या किमान दोन तास आधी ते बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. अंधारात स्क्रीन पाहणे टाळा. टीव्ही पाहण्याची वेळ कमी करा. याव्यतिरिक्त संध्याकाळी तुमच्या डोळ्यांना थोडी विश्रांती द्या, जसे की थंड पट्टी लावणे किंवा डोळ्यांवर काकडी ठेवणे.

आहारात सुधारणा

कधीकधी डोळ्यांखालील काळी वर्तुळे हे पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण देखील असू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमचा आहार सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही एखाद्या तज्ञाचा सल्ला घेऊन तपासणीनंतर योग्य आहार घेऊ शकता. एवढेच नाहीतर तुम्ही अनहेल्दी पदार्थ टाळून हंगामी भाज्या, फळे, बिया, सुकामेवा, धान्ये, सुकी फळे इत्यादींचा नियंत्रित पद्धतीने तुमच्या आहारात समावेश करू शकता. यामुळे बराचसा परिणाम तुमच्या आरोग्यासोबतच डोळ्यांवरही होतो.

शरीरातील पाण्याचे प्रमाण सुधारा

डोळ्यांखालील काळी वर्तुळे शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे (डिहायड्रेशनमुळे) देखील होऊ शकतात. भरपूर पाणी प्या. दिवसभरात एकदा नारळाचे पाणी, लिंबू सरबत, ताक यांसारखी आरोग्यदायी पेये घेणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त डोळ्यांखालील त्वचा ओलसर ठेवा. तुम्ही त्या भागावर काही वेळ चांगल्या तेलाने मालिश करू शकता.

वाईट सवयी बदला

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांपासून ते ओठांवरील आणि त्वचेवरील काळवंडण्यापर्यंत या सर्व गोष्टी अतिमद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या वाईट सवयींमुळे होऊ शकतात. जर तुम्हाला या वाईट सवयी असतील तर तुम्ही त्या ताबडतोब बदलल्या पाहिजेत. यामुळे केवळ तुमची त्वचाच नाही, तर तुमचे संपूर्ण आरोग्यही सुधारेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी
भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी.
खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा.
खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर; चाकणकर शिर्डी पोलिसांच्या रडारवर
खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर; चाकणकर शिर्डी पोलिसांच्या रडारवर.
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?
एकनाथ शिंदें ऐवजी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार? राऊतांचं विधान काय?.
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत
शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?; राऊतांचे विधान चर्चेत.
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी
जळगावात धक्कादायक प्रकार! KYCच्या बहाण्याने महिलेाकडे शरीरसुखाची मागणी.
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
आशा भोसलेंचं निधन, शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार.
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन
संगीत क्षेत्रातल्या युगाचा अस्त, आशा भोसलेंचं 92 व्या वर्षी निधन.
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.