AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमाई वाढवण्याचे हे ७ अचूक फॉर्म्युले, यांच्या मदतीने कधीच जाणवणार नाही तंगी

जर तुम्ही तुमच्या कमाईला योग्य प्रकारे मॅनेज करु इच्छीत आहात आणि भविष्यासाठी एक मजबूत फायनान्शिय प्लान बनवू इच्छीता तर गुंतवणूकीचे हे सात नियम तुमच्या खूप उपयोगी येऊ शकतात.

कमाई वाढवण्याचे हे ७ अचूक फॉर्म्युले, यांच्या मदतीने कधीच जाणवणार नाही तंगी
note 500 rupees
| Updated on: May 31, 2026 | 4:46 PM
Share

पैसे कमावणे जेवढे गरजेचे असते तेवढेच त्याची योग्य जागी गुंतवणूक करणे आणि समजदारीने खर्च करणे गरजेचे असते. आजच्या काळात गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतू यशस्वी गुंतवणूकदार तोच बनू शकतो जो काही सोप्या आर्थिक नियमांना समजून त्यांचे पालन करतो. हा नियम न केवळ गुंतवणूक योजना तयार करण्यास मदत करतो, तर भविष्यातील आर्थिक गरजांना देखील सुरक्षित बनवतो. कारण शेअर बाजारात जागतिक तणावाने गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले आहेत. अशावेळी योग्य गुंतवणूकीचे धोरण तुमच्या मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवेलच शिवाय त्यात वाढ देखील करेल.अशा जाणून घेऊयात ७ असे गुंतवणूकीचे नियम जे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करू शकतील.

Rule of 72: पैसा केव्हा दुप्पट होईल ?

गुंतवणूकीच्या जगात Rule of 72 खूप लोकप्रिय आहे.याच्या मदतीने तुमची गुंतवणूक किती काळात दुप्पट होईल याची पडताळणी करता येते. यासाठी ७२ ला गुंतवणूकीवर मिळणाऱ्या वार्षिक परताव्याने भागले जाते. जर समजा एखाद्याला गुंतवणूकीवर १२ टक्क्यांचे वार्षिक रिटर्न मिळत असेल तर ७२ ला १२ ने भागल्यानंतर ६ उत्तर येते. याचा अर्थ सुमारे ६ वर्षात येथे तुमचा पैसा दुप्पट होईल.

Rule of 114: तिप्पट पैशांचे गणित काय ?

जर तुम्हाला तुमची गुंतवणूक तिप्पट कधी होईल ही माहिती काढायची असेल तर Rule of 114 मदतीला येऊ शकतो. यात ११४ ला अंदाजित रिटर्न दराने भागले जाते. जर गुंतवणकीवर १२ टक्के रिटर्न मिळत आहे. तर सुमारे ९.५ वर्षांनी हे पैसे तिप्पट होऊ शकतात.

Rule of 144: चार पट पैसे रिटर्नचा फॉर्म्यूला

तसेच, Rule of 144 हे सांगतो की गुंतवणूक चार पट होण्यास किती वेळ लागतो.यासाठी १४४ ला वार्षिक रिटर्नने भागावे. जर रिटर्न १२ टक्के असेल तर सुमारे १२ वर्षात रक्कम चौपट होऊ शकते.

50-30-20 Rule: कमाईचे योग्य वाटप

हा नियम बजेट तयार करण्यासाठी खूपच लोकप्रिय आहे. याला तुम्ही मासिक सॅलरीनुसार सेट करु शकता. उदाहरणासाठी जर तुम्हाला महिन्याला ५० हजार पगार आहे.तर तुम्ही या पगाराला तीन भागात वाटा,ज्यात ५० टक्के म्हणजे २५ हजार आवश्यक खर्चासाठी राखून ठेवा.

ज्यात तुमचे रेशन आणि भाडे जाईल. याशिवाय उरलेल्या २५ हजाराला दोन भागात वाटा, ज्यात ३० टक्के पैसा मनोरंजन, हॉटेलिंग,प्रवासासाठी राखून ठेवा. उरलेला २० टक्के पैसा दर महिन्याला गुंतवणूकीसाठी ठेवा. त्यातील काही पैसा एसआयपीमध्ये टाका, तर काही कॅश रिझर्व्ह म्हणून राहू द्या. यामुळे आर्थिक शिस्त लागेल.

100 Minus Age Rule: इक्विटी आणि डेटचे संतुलन

हा नियम सांगतो की गुंतवणूकीचा किती हिस्सा इक्विटी आणि किती हिस्सा डेटमध्ये असायला हवा. यात १०० मधून तुमच्या वयाला मायनस केल्यानंतर जी संख्या येते. तेवढी गुंतवणूक इक्विटीमध्ये ठेवता येते. उदा. ३० वय असेल तर ७० टक्के गुंतवणूक इक्विटी आणि ३० टक्के डेटमध्ये राखता येऊ शकते.

Minimum 10% Investment Rule

तज्ज्ञांच्या मते व्यक्तीने त्याच्या कमाईचा किमान १० टक्के भाग नेहमीच गुंतवणूकीच्या रुपात ठेवला पाहिजे. तसेच उत्पन्न वाढल्यानंतर गुंतवणूकीची रक्कम देखील वाढविली पाहिजे. म्हणजे दीर्घकाळात मोठा फंड जमा होऊ शकेल.

Emergency Fund Rule: अडचणीच्या काळात मदत

आर्थिक योजनेचा सर्वात मोठा हिस्सा इमर्जन्सी फंड असतो. हा असा फंड आहे जो नोकरी गेल्यास, आजारपण किंवा अन्य आकस्मिक स्थितीत मदतीला येतो. सर्वसाधारण पणे किमान सहा महिन्यांच्या खर्चा ऐवढी रक्कम इमर्जन्सी फंडाच्या रुपात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यात ७ नियमांच्या मदतीने कोणतीही व्यक्ती आपली बचत, गुंतवणूक आणि खर्चात चांगल्या प्रकारे संतुलन बनवू शकता. योग्य वित्तीय शिस्त आणि दीर्घ काळाच्या विचारासोबत हे फॉर्म्युले तुम्हाला आर्थिक रुपाने मजबूत बनवण्यास महत्वाची भूमिका निभावू शकतात.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?.

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या.

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप.

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप