AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Final : …तर आरसीबी सामना न खेळताच जिंकणार ट्रॉफी, गुजरातला टेन्शन, जाणून घ्या नियम

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Weather Report: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स दोन्ही संघांनी अथक परिश्रमानंतर अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. मात्र परिस्थिती जुळल्यास आरसीबी सामना न खेळताच विजेता ठरु शकते. जाणून घ्या 3 नियम.

IPL 2026 Final : ...तर आरसीबी सामना न खेळताच जिंकणार ट्रॉफी, गुजरातला टेन्शन, जाणून घ्या नियम
IPL 2026 RCB vs GT Weather ReportImage Credit source: PTI
| Updated on: May 31, 2026 | 4:58 PM
Share

अवघ्या एका सामन्याच्या निकालानंतर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) विजेता कोण असणार? हे स्पष्ट होणार आहे. या 19 व्या हंगामातील अंतिम सामन्यात 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आरसीबीकडे सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याची संधी आहे. तर गुजरातकडे एकूण दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. त्यामुळे कोणता संघ विजेता ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने अहमदाबादमधील हवामान कसं असणार? तसेच राखीव दिवशीही सामना न झाल्यास कोणता संघ विजेता ठरणार? हे जाणून घेऊयात. सामन्यात पावसाने विघ्न घातल्यास 3 नियमांच्या आधारे विजेता निश्चित केला जातो. या 3 नियमांबाबत जाणून घेऊयात.

नियम 1 काय?

साधारणपणे सामन्यात पावसाने जास्त वेळ व्यत्यय आणल्यास परिस्थितीनुसार ओव्हर कमी केले जातात. त्यानुसार ठराविक षटकांचा खेळ होतो. त्यानुसार विजेता निश्चित होता. मात्र पावसाने प्रभावित झालेल्या सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान 5-5 ओव्हरचा खेळ होणं गरजेचं असतं.

नियम 2

सामन्याचा निकाल लागावा यासाठी राखीव दिवसाची तरतूद आहे. मुख्य दिवशी सामना झाला नाही तरच राखीव दिवशी सामना होतो. राखीव दिवशी दोन्ही संघांना प्रत्येकी 120-120 षटकांचा वेळ असतो. आयपीएल स्पर्धेत 2023 साली अंतिम फेरीतील मुख्य दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर राखीव दिवशी सामना खेळवण्यात आला होता.

राखीव दिवशी सामना न झाल्यास विजेता कोण?

राखीव दिवशी सामना न झाल्यास कोणत्या आधारे विजेता निश्चित केला जातो? असा क्रिकेट चाहत्यांचा प्रश्न आहे. याबाबत जाणून घेऊयात. राखीव दिवसही रद्द झाल्यास 2 फायनलिस्ट टीमपैकी साखळी फेरीत पॉइंट्स टेबलमध्ये टॉपला असणाऱ्या संघाला विजेता घोषित केलं जातं. या नियमानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पुन्हा एकदा आयपीएल विजेता ठरेल.

अहमदाबादमधील हवामान कसं आहे?

क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक माहिती अशी की अहमदाबादमध्ये सामन्याच्या मुख्य दिवशी पावसाची अजिबात शक्यता नाही. एक्युवेदरनुसार, पावसाची शक्यता नाही. तसेच हवामान स्वच्छ असणार आहे. त्यामुळे मुख्य दिवशीच विजेता निश्चित होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

Follow Us
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं
मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता... त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं.
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्
परळीवाल्याला तर आता... मनोज जरांगेंनी काढला त्या घातपाताचा विषय अन्.