AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावणे फायदेशीर? तेल लावताना करू नका ‘या’ चुका

रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीच्या एक तास आधी केसांना तेल लावावे. कारण जर तुम्ही केसांना तेल लावल्यानंतर बाहेर गेलात तर तुमच्या केसांवर धूळ आणि घाण जमा होते ज्यामुळे कोंडा होतो. म्हणून, केसांना तेल लावण्यापूर्वी, वेळ आणि पद्धतीची विशेष काळजी घ्या. तसेच केसांना तेल लावताना कोणत्या चुका टाळ्या पाहिजे हे आपण आजच्या लेखातुन जाणुन घेऊयात...

रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावणे फायदेशीर?  तेल लावताना करू नका 'या' चुका
केसाना तेल लावण्यापूर्वी हे जरूर वाचा
| Edited By: | Updated on: Apr 25, 2025 | 3:27 PM
Share

प्रत्येकजण केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करत असतात. त्यासोबत हेअर मास्कच्या मदतीने केसांची योग्स काळजी घेता येते. अशातच काहीजण केसांच्या काळजीकरिता केसांना तेलाने मसाज करता आणि रात्रभर तसेच ठेवतात. त्यामुळे केसांची मुळ तेल योग्यरित्या शोषले घेतात. खरंतर केसांना तेल लावल्याने त्यांना चांगले पोषण मिळते आणि केस नैसर्गिकरित्या चमकतात. पण आपल्यापैकी अनेकांच्या मनात असा संभ्रम आहे की रात्री केसांना तेल लावण्याने केसांमध्ये असलेली धूळ आणि घाण केसांना तशीच राहते ,ज्यामुळे कोंडा किंवा इतर केसांच्या समस्या उद्भवतात.

एवढेच नाही तर केस गळणे देखील सुरू होते. अशा परिस्थितीत, रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावावे की नाही हा प्रश्न पडतो. चला तर मग जाणुन घेऊयात याबद्दल…

रात्री देखील केसांना तेल लावायला हवे?

रात्री केसांना तेल लावून झोपण्याचे अनेक फायदे आहेत. हे तुमचे केस तुटण्यापासून रोखते आणि तेल लावल्याने केसांना भरपूर पोषक तत्वे देखील मिळतात. ज्यामुळे केस निरोगी, रेशमी आणि चमकदार बनतात. केसांना तेल लावून रात्री झोपल्याने, तेलात असलेले फॅटी अ‍ॅसिड आणि पोषक घटक स्कॅल्पच्या छिद्रांमध्ये खोलवर शोषले जातात.

रात्रभर डोक्याला तेल लावून झोपल्याने स्कॅल्पला ओलावा मिळण्यास मदत होते. जर तुमचे केस खूप फ्रिजी आणि कुरळे असतील तर तुम्ही तुमच्या केसांना नक्कीच तेल लावावे. हे खूप फायदेशीर आहे. केसांना तेल लावल्याने स्कॅल्प ओलसर राहते आणि केस फ्रिजी होण्यापासून वाचतात आणि खाजही कमी होते.

केसांना तेल लावताना या चुका करू नका

केसांमध्ये योग्य तेल वापरा:  जेव्हा तुम्ही तुमच्या केसांना तेल लावता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या केसांवर कोणत्या प्रकारचे तेल वापरत आहात. केसांना तेल लावण्यासाठी नेहमी नारळ तेल, ऑलिव्ह तेल, आर्गन तेल आणि बदाम तेल लावा. रात्रभर केसांमध्ये तसेच राहू द्या.

तेल लावण्याची पद्धत:  जेव्हाही तुम्ही केसांना तेल लावता तेव्हा ते मर्यादेत लावा. केसांमधून तेल बाहेर पडेल अशा पद्धतीने तेल लावू नका. जास्त तेल लावणे टाळा. जेव्हाही तुम्ही तेल लावता तेव्हा ते केसांच्या मुळांना आणि टोकांना लावा जेणेकरून केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळेल. तेल लावताना तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुम्ही वेगवेगळी तेले एकत्र मिसळून ते लावू शकता. जसे की ऑलिव्ह, नारळ आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण लावा.

डोक्याला दाब देऊन मालिश करू नका: जेव्हाही तुम्ही केसांना तेल लावून मालिश कराल तेव्हा ते हलक्या हातांनी करा. कधीही उलट्या हातांनी किंवा जोर देऊन मालिश करू नका. यामुळे तुमच्या स्कॅल्पच्या आत रक्ताभिसरण सुधारते. रात्री जेव्हा तुम्ही केसांना तेल लावता तेव्हा झोपण्यापूर्वी केसांना शॉवर कॅप किंवा टॉवेलने गुंडाळा. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी केस पूर्णपणे धुवा. जेणेकरून केसांमधून तेल व्यवस्थित निघून जाईल, अन्यथा घाण आणि कोंडा दिसू लागेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.