तुम्हीही अतिविचाराचे बळी आहात का? या सवयीला तोंड देण्यासाठी वापरा या टिप्स

सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. यामध्येच एक समस्या म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे. तुम्हाला देखील कोणत्याही गोष्टीवर अतिविचार करण्याची सवय असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करु शकतात.

तुम्हीही अतिविचाराचे बळी आहात का? या सवयीला तोंड देण्यासाठी वापरा या टिप्स
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 5:04 PM

Mental Health : अनेक जण सध्या तणावात जगत आहेत. सध्याचं स्पर्धेचे युग आणि चुकीची जीवनशैली यामुळे लोकांमध्ये तणाव वाढला आहे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी काही गोष्टींवर भर दिला पाहिजे. त्यासाठी निरर्थक गोष्टींवर विचार न करणे. पण सध्या अतिविचार करणाऱ्यांची एक श्रेणी वाढत आहे जी कोणत्याही गोष्टीबद्दल जास्त विचार करू लागतात. ज्याचा मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. मानसिक आरोग्य हे आपल्या शारीरिक आरोग्याशी जोडलेले आहे. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जाते. त्यामुळे त्याचे गांभीर्य समजून घेणे आणि त्यापासून सुटका करण्याचे उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.

भावनिक असलेले लोकं अतिविचार करतात. सर्व काही ते मनावर घेतात आणि पुढे होणार याची चिंता सतावत असते. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर प्रभाव पडतो. अनेक वेळा यामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्येही जाते.

जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बऱ्याच वेळा लोक ओव्हरथिंकिंगला सामोरे जाण्यासाठी दारू किंवा सिगारेटचा अवलंब करतात, ज्या अधिक हानिकारक आहे. त्यामुळे या सवयीपासून मुक्त होण्यासाठी, या चुकीच्या पद्धतींचा अवलंब करण्याऐवजी, तुम्ही येथे दिलेल्या टिप्सची मदत घेऊ शकता.

स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये व्यस्त ठेवा

रिकामं मन हे सैतानाचं घर आहे असं म्हणतात, त्यामुळे जर एखाद्या गोष्टीने तुम्हाला खूप त्रास दिला असेल, ज्याचा विचार करून तुम्हाला राग येत असेल, तर त्याला शांत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवणे. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतून राहण्याचा प्रयत्न करा.

नकारात्मक लोकांपासून दूर रहा

अशा लोकांपासून अंतर ठेवा जे तुम्हाला नकारात्मक भावना देतात. जर समोरची व्यक्ती तुम्हाला मुद्दाम त्रास देत असेल तर त्याच्याशी त्याच पद्धतीने बोला आणि त्याला सामोरे जा. जर तुमचे मन हे समर्थन करत नसेल तर त्यांच्याशी संपर्क संपवणे चांगले.

व्यायाम आणि ध्यान करा

मन शांत ठेवण्यासाठी योग आणि ध्यान करा. ध्यान तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते, ज्यामुळे अतिविचार करण्याची सवय व्यवस्थापित करणे सोपे होते.

Non Stop LIVE Update
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.