AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fitness Test : तुमच्या वयोगटानुसार सलग इतकी मिनिटं पळू शकता का ? तुम्हाला लगेच कळेल तुमची फिटनेस लेवल

Fitness Test : बाहेरच्या फिटनेसपेक्षा आतला फिटनेस जास्त महत्वाचा आहे. तुमच्या वयोगटानुसार एका सिंपल टेस्टने तुम्हाला तुमचा फिटनेस कळेल. बातमीच्या आता तुमच्या वयोगटानुसार किती मिनिटं धावणं हे चांगल्या आरोग्याचे संकेत आहेत. त्याची माहिती दिलीय.

Fitness Test : तुमच्या वयोगटानुसार सलग इतकी मिनिटं पळू शकता का ? तुम्हाला लगेच कळेल तुमची फिटनेस लेवल
Running
| Updated on: Apr 03, 2026 | 8:06 AM
Share

जीममध्ये तुम्ही कशी ट्रेनिंग करता, किती वजन उचलता, तो एकमेव फिटनेसचा निकष नाही. मागच्या काही वर्षात तुम्ही सिद्धार्थ शुक्ला सारख्या अनेक लोकांबद्दल ऐकलं असेल जे बाहेरुन दिसायला फिट होते, पण काही कारणांमुळे अचानक कोसळले. याचं कारण आहे, सध्याच्या धावपळीच्या जमान्यात फक्त तुम्ही वरवरच्या फिटनेसवर लक्ष देता. पण तुमची इनर आणि कार्डियोवॅस्कुलर हेल्थवर लक्ष देत नाही. जीममध्ये जाणाऱ्यांना असं वाटतं की ते ठीक आहेत. पण खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा शरीरावर थोडा दाब वाढतो. खरी फिटनेस टेस्ट तुमची जीममधील ताकद नाही, तर तुम्ही धावण्याची क्षमता आहे.

एक्सपर्ट्सनुसार प्रत्येक वयाचं शरीर एका सरासरी वेळेपर्यंत पळू शकतं. जर, तुम्ही तेवढं पळू शकत नसाल, तर समजून जा की, शरीराचा स्टॅमिना, कार्डियोवॅस्कुलर हेल्थ म्हणजे ह्दय आणि फुफ्फुसांचं आरोग्य हळूहळू खराब होत चाललं आहे. डॉक्टरांनुसार, कमीवेळ धावणं, वाढता थकवा आणि धाप लागणं हे हेल्थ रुटीनवर लक्ष देण्याची वेळ आल्याचे संकेत आहेत.

20 ते 30 वयोगटाने किती मिनिटं धावलं पाहिजे?

हेल्थ एक्सपर्ट्सनुसार प्रत्येक वयाच्या फिटनेससाठी वेगवेगळे आकडे आहेत. अमेरिकन हार्ट एसोसिएशन आणि CDC नुसार 20 ते 30 वयोगटाने कमीत कमी 25 ते 30 मिनिटं धावण्यासाठी सक्षण असलं पाहिजे.

30 ते 40, 40 ते 50 वयोगटातील लोकांनी किती मिनिटं धावलं पाहिजे?

30 ते 40 वयोगटासाठी 20-25 मिनिट रन टाइम नॉर्मल मानला जातो. 40-50 वयानंतर 15-20 मिनिटं धावणं हेल्दी कार्डियोचे संकेत आहेत. 50 पेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वॉक-जॉग फॉर्म 10-15 मिनिट पुरेसा आहे. जर, तुम्ही इतकी मिनिटं धावण्याआधी थकत असाल, तुम्हाला धाप लागत असेल तर तुमचा फिटनेस लेवल खाली जातोय. हे आकडे केवळ एथलीट्ससाठी नाहीत, तर सामान्य लोकांनी स्वस्थ राहण्यासाठी सुद्धा आवश्यक आहेत.

रनिंग स्टॅमिना कमी होण्याचं मुख्य कारण काय?

फिजिकल एक्टिविटीची कमतरता आणि खराब डाएट हे रनिंग स्टॅमिना आणि कॅपेसिटी पडण्यामागचं मुख्य कारण आहे. जसं-जसं वय वाढत जातं, मसल मास, फुप्फुसांची क्षमता आणि ह्दयाची पंपिंगची क्षमता कमी होत जाते.

फुप्फुसांची क्षमता कशामुळे कमी होते?

जर, तुम्ही अनेक तास बसून राहत असलास तर मसल्स टाइट होतात. मेटाबॉलिज्म कमी होतं. त्याशिवाय स्मोकिंग, झोपेची कमतरता आणि जास्त तणाव यामुळे फुप्फुसांची क्षमता कमी होते. जेव्हा तुम्ही धावण्याचा प्रयत्न करता तेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे तुम्ही लवकर थकता.

डॉक्टर्स म्हणतात, जर कोणी नियमित व्यायाम करत नाहीय तसच चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी असतील तर प्रकृती अजून वेगाने ढासळते. हार्ट रनिंग कॅपेसिटी आणि स्टॅमिना कमी होण्यामागे फक्त वय नाही, तर सुस्त लाइफस्टाइल त्याला जबाबदार आहे.

फिटनेस कॅपेसिटी वाढवण्यासाठी काय करालं?

वरती सांगितलय तेवढा वेळ तुम्ही धावू शकत नसाल, तर टेन्शन घेऊ नका. हळू-हळू तुम्ही तुमच्या फिटनेसवर काम करुन त्यात सुधारणा करु शकता. तुम्ही जोरात चालण्याने किंवा ब्रिक्स वॉकिंग करा. त्यानंतर चालणं आणि धावण एकत्र करा. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन आणि कॉम्पलेक्स कार्ब्सचा समावेश करा. हायड्रेशची पूर्ण काळजी घ्या. त्याशिवाय तुम्ही एखादा कोच किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे रुटीन फॉलो करा.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....