केस गळतीशी झुंजत आहात का? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सुचवली ‘ही’ केस धुण्याची नैसर्गिक पद्धत
सामान्यतः तुम्ही तुमचे केस शाम्पूने धुता, परंतु जर तुमचे केस जास्त गळत असतील किंवा तुमच्या केसांची चमक नाहीशी झाली असेल, तर आजच्या लेखात आपण या हेअर वॉश हॅक बद्दल जाणून घेणार आहोत तेही तज्ञांकडून...

आजकाल जवळजवळ सर्वांनाच केस गळतीची समस्या सतावत असते. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे आपला आहारात अनेक बदल होत आहेत. त्यासोबतच प्रदूषण यामुळे आरोग्यासोबतच केस गळणे, अकाली पांढरे होणे, चमक कमी होणे आणि कोरडे दिसणे अशा समस्या उद्भवू लागले आहेत. तर या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी अनेकजण बाजारात मिळणारे हेअर केअर प्रोडक्ट तसेच महागडे शॅम्पू, सीरम वापरतात. परंतू कालांतराने त्यांचा फारसा फायदा होत नाही. तर आजच्या लेखात आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलेला एक साधा शॅम्पू हॅक जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे केस चमकदार होतील.
साध्या शाम्पूऐवजी हा केस धुण्याचा हॅक वापरून पहा
साधारणपणे आपण प्रत्येकजण केस शाम्पूने धुतो, परंतु जर तुमचे केस खूप गळत असतील किंवा तुमचे केस चमकदार नसतील, तर तुम्ही हे हेअर वॉश हॅक वापरून पाहू शकता. तर तज्ञ सांगतात की तुम्हाला हेअर वॉश बनवण्यासाठी चहापावडरचे पाणी बनवावे लागेल, त्यात शाम्पू आणि काही इतर घटक मिक्स करावे लागतील आणि नंतर तुमचे केस तुम्ही धुवू शकता. यामुळे केस गळणे कमी होईल आणि केसांची वाढ जलद होईल. चला हे हेअर वॉश कसे बनवायचे ते जाणून घेऊयात.
प्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी मिक्स करा आणि त्यात दोन चमचे चहा पावडर टाकून ते पाणी उकळवा आणि फक्त अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहेपर्यंत उकळून घ्या.
तयार चहा पावडरचे पाणी एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात इन्स्टंट कॉफीची एक छोटी पॅकट मिक्स करा.
नंतर एक चमचा ताजे कोरफड जेल आणि तुम्ही वापरत असलेला शॅम्पूचे तीन ते चार चमचे मिक्स करा.
आता, तुमचा सामान्य शाम्पू वापरण्याऐवजी, तुम्ही आठवड्यातून दोनदा तुमचे केस धुण्यासाठी हे वापरू शकता.
काही आठवड्यात दिसून येईल रिजल्ट
तर यावेळी आयुर्वेदिक तज्ञ सांगतात की जेव्हा तुम्ही केस धुवायला जाल तेव्हा चहापावडर पासून तयार केलेलं पाण्याचा हा उपाय नक्की करून पहा. यामुळे काही आठवड्यांत केस गळती लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. शिवाय जर तुमचे केस विशेषतः कोरडे असतील तर ते मऊ आणि रेशमी देखील बनू शकतात. जर तुमच्या केसांची चमक गेली असेल तर कॉफी आणि चहाच्या पानांमुळे त्यांची नैसर्गिक चमक परत येऊ शकते.
https://www.instagram.com/reels/DMnH7RvA33H/
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
