कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशी, मध आणि कढीपत्त्याच्या काढा फायदेशीर !

देशात कोरोनाचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशी, मध आणि कढीपत्त्याच्या काढा फायदेशीर !
खास पेय

मुंबई : देशात कोरोनाचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच, आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. यासाठी आपल्या घरात अशी अनेक औषधे आहेत. ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होण्यास मदत होईल. त्यात तुळशी, मध आणि कढीपत्त्याच्या काढाचा समावेश करा. या काढ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (Basil, honey and curry are beneficial for boosting the immune system)

हा काढा तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक ग्लास पाणी उकळण्यासाठी मंद आचेवर ठेवावे लागणार आहे. त्यानंतर काढा तयार करण्यासाठी त्या पाण्यात कढीपत्ता आणि तुळशीची पाने घाला. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मध मिक्स करा. अशा प्रकारे आपला काढा तयार आहे. हा काढा आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. कढीपत्त्यामुळे केवळ अन्नाची चवच वाढत नाही. उलट हे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

कढीपत्त्यात पौष्टिक पदार्थ असतात. यामध्ये प्रथिने, लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे अ, बी, सी भरपूर प्रमाणात असतात. याचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी केला जातो. जसे की अशक्तपणा, रक्तदाब, पाचक प्रणाली योग्य ठेवण्यासाठी कढीपत्त्या खाणे फायदेशीर आहे.
मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे.

आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो. खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो.तुळशीमध्ये अँटीबायोटिक, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात.

आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळश कार्य करते. तुळशीची पाने ताप आणि सर्दीसाठी फायदेशीर आहेत. आपण चहामध्ये टाकून तुळशीच्या पानांचे सेवन करू शकतो. यासाठी तुळशीची पाने पाण्यात उकळावी लागतील आणि त्याचे सेवन करावे लागेल. तुळशीत रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अँटीऑक्सिडेंट असतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. चहामध्ये किंवा कच्चे देखील आपण तुळशीचे पाने खाऊ शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!

(Basil, honey and curry are beneficial for )

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI