जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेले ‘हे’ 5 फेस पॅक चेहऱ्यावरील काळे डाग व मुरुमांची समस्या करतील कमी
जास्वंदाचे फूल त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. या फुलापासून अनेक प्रकारचे फेस पॅक बनवता येतात जे तुमच्या त्वचेवरील काळे डाग आणि मुरुम यासारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण जास्वंदाच्या फुलापासून फेस पॅक कसे बनवायचे त्याबद्दल जाणून घेऊयात.

जास्वंदीचे फूल जास्त करून आपण देव्हाऱ्यात व मंदिरात देवाजवळ ठेवण्यास वापरत असतो. तर या फूलाचा जसा धार्मिक गोष्टींसाठी केला जातो तसाच वापर त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी केला जातो. कारण जास्वंदींचे फूल आपल्या त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. कारण यामध्ये व्हिटॅमिन-सी, अँटीऑक्सिडंट्स आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे चेहऱ्याचा रंग सुधारण्यास, मुरुमांची समस्या दूर करण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला जास्वंदीच्या फुलापासून बनवलेल्या 5 सोप्या फेस पॅकबद्दल सांगणार आहोत, जे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर बनविण्यास मदत करतील.
जास्वंदीचे फुल आणि दही पॅक
2-3 जास्वंदाची फुले घ्या आणि त्यांची बारीक करून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये एक चमचा दही टाका आणि चांगले मिक्स करा. आता तयार झालेला फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे सुकू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेला एक्सफोलिएट करते. तर जास्वंद त्वचा उजळवते आणि डाग कमी करते.
जास्वंदीचे फुल आणि मधाचा फेसपॅक
दोन जास्वंदाची फुले बारीक करा आणि त्यात एक चमचा मध मिक्स करा, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा धुवा. या पॅकमध्ये वापरलेले मध त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करते . तसेच ज्या लोकांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी हा फेस पॅक खूप फायदेशीर आहे.
जास्वंदीचे फुल आणि मुलतानी माती फेसपॅक
दोन जास्वंदीच्या फुलांची पेस्ट बनवा आणि त्यात एक चमचा मुलतानी माती आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी टाकूल पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक चेहऱ्यावरील तेल नियंत्रित करण्यास मदत करतो, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते. जास्वंदमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांशी लढण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहेत.
जास्वंदीचे फुल आणि लिंबाचा फेसपॅक
दोन जास्वंदीच्या फुलांची बारीक पेस्ट तयार करा आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पेगमेंटेशनची समस्या कमी होते . हा फेसपॅक लावल्याने त्वचा चमकदार होते.
जास्वंदीचे फुलआणि कोरफड जेलचा फेसपॅक
दोन जास्वंदीच्या फुलांची बारीक पेस्ट तयार करा आणि त्यात एक चमचा कोरफड जेल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवा. कोरफडीमुळे सूज आणि जळजळ कमी होते. तसेच हा फेसपॅक सनटॅन काढून टाकण्यास मदत करतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)