Face Pack : अ‍ॅवकाडोचे ‘हे’ फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!

अ‍ॅवकाडो हे सुपरफूड आहे. जे पौष्टिकतेने समृद्ध आहे. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात असलेले पोषक घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. अ‍ॅवकाडोचे अनेक प्रकारचे फेसपॅक आपण घरच्या घरी तयार करू शकतो. जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

Face Pack : अ‍ॅवकाडोचे ‘हे’ फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 3:50 PM

मुंबई : अ‍ॅवकाडो हे सुपरफूड आहे. जे पौष्टिकतेने समृद्ध आहे. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात असलेले पोषक घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. ज्यात जीवनसत्त्वे बी, सी, ई आणि के, रिबोफ्लेविन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ल्यूटिन, बीटा-कॅरोटीन, ओमेगा -3 फॅटी अॅसिड तसेच वृद्धत्व विरोधी अँटीऑक्सिडंट्स आहेत. चमकदार त्वचेसाठी आपण अ‍ॅवकाडो वापरू शकता. अ‍ॅवकाडो फेसपॅक त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करतो. हे त्वचेचे अकाली वृद्धत्व रोखू शकते. (Avocado and honey face pack beneficial for skin)

दही आणि अ‍ॅवकाडो फेसपॅक

हे पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त 1/4 अ‍ॅवकाडो, दोन चमचे दही आणि एक चमचे मध लागेल. फेसपॅक बनवण्यासाठी हे साहित्य मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा स्वच्छ करून लावा. 20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून दोनदा त्याचा वापर करू शकता. दही आणि अ‍ॅवकाडो फेसपॅक आपली त्वचा मऊ करण्यास मदत करू शकतात.

अ‍ॅवकाडो आणि हळदीचा फेसपॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी अर्धा अ‍ॅवकाडो आणि हळद घ्या. हळदीचे मुळ धुवून सोलून किसून घ्या. त्यात मॅश केलेला अ‍ॅवकाडो घाला. चांगले मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा. अ‍ॅवकाडो आणि हळद यांचे मिश्रण पिग्मेंटेशनच्या उपचारात आणि त्वचेला चमकदार बनविण्यात मदत करते.

अ‍ॅवकाडो लगदा

अ‍ॅवकाडो घ्या त्याचा लगदा बाहेर काढा आणि मॅश करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. त्वचेवर 20-30 मिनिटे तसेच सोडा. त्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा हे वापरू शकता. यामुळे आपल्या कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

अ‍ॅवकाडो आणि मध

अ‍ॅवकाडोचा लगदा चार चमचे घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट 20 ते 30 मिनिटे चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा पॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा आपल्या चेहऱ्याला लावू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Avocado and honey face pack beneficial for skin)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.