AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस गळतीची समस्या?, ‘हा’ तुळशीच्या पानांचा हेअर मास्क एकदा नक्की ट्राय करा

तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे, तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते, जी एखाद्या व्यक्तीला अनेक आजारांपासून वाचवते.

केस गळतीची समस्या?, 'हा' तुळशीच्या पानांचा हेअर मास्क एकदा नक्की ट्राय करा
केस गळती
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 5:56 PM
Share

मुंबई : तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे, तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते, जी एखाद्या व्यक्तीला अनेक आजारांपासून वाचवते. तुळशीपासून अनेक सौंदर्यवर्धक आणि आरोग्यवर्धक फायदे देखील मिळतात. विशेष म्हणजे केस गळती रोखण्यासाठी आणि केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळस अत्यंत फायदेशीर आहे. (Basil hair mask is beneficial to prevent hair loss)

केस गळती रोखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला दहा ते बारा तुळशीची पाने, चार चमचे दूध, एक चमचा मध, दोन चमचे दही, एक चमचा खोबरेल तेल लागणार आहे. सर्वात अगोदर तुळशीच्या पानांची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करा. त्यानंतर एक तासांसाठी संपूर्ण केसांना ही पेस्ट लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपले केस धुवा.

तुळशीच्या उपयोगामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने वापरणे हा रामबाण उपाय आहे. तुळशीच्या पानांचे चूर्ण संत्र्याच्या पावडरमध्ये मिक्स करा आणि यापासून पेस्ट तयार करा. संत्र्याच्या सालांची पावडर देखील आपण घरच्या घरी तयार करू शकता अथवा आयुर्वेदिक स्टोअरमधून विकत घेऊ शकता. तुळस आणि संत्र्याच्या पावडरपासून तयार केलेल्या पेस्टनं दोन ते तीन मिनिटांसाठी दात ब्रशने स्वच्छ करा. यानंतर पाण्याने तोंड धुऊन घ्या.

ही प्रक्रिया रात्री झोपण्यापूर्वी नियमित करायची आहे. मुरुम कमी करण्यासाठी तुळशीचे दोन पाने (ताजी) घ्या. गुलाब पाण्याच्या एक ते दोन थेंबामध्ये ही पाने कुस्करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मुरुमांवर लावा आणि सुकू द्या. त्वचेचा रंग उजळण्यासाठीही आपण तुळशीचा उपयोग करू शकता. यासाठी तुळशीची ताजी पाने किंवा तुळशीची पावडर वापरावी. तुळशीची 15 ते 20 पाने वाटून त्यामध्ये दोन चमचे दूध मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा.

(टीप : डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

संबंधित बातम्या : 

Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…  

आकर्षक वनस्पतींनी खुलवा घरांची सजावट, जाणून घ्या कशी करायची देखभाल?

(Basil hair mask is beneficial to prevent hair loss)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.