AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : मऊ आणि चमकदार त्वचेसाठी लोण्याचा फेस मास्क लावा, फेस मास्क कसा लावणार? जाणून घ्या!

पावसाळ्यात त्वचा कोरडी दिसते. यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते. यामुळे बारीक रेषा, सुरकुत्या आणि मुरुमांची समस्या वाढते. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती ताजे लोणी वापरू शकता.

Skin Care Tips : मऊ आणि चमकदार त्वचेसाठी लोण्याचा फेस मास्क लावा, फेस मास्क कसा लावणार? जाणून घ्या!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 7:56 AM
Share

मुंबई : पावसाळ्यात त्वचा कोरडी दिसते. यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते. यामुळे बारीक रेषा, सुरकुत्या आणि मुरुमांची समस्या वाढते. त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती ताजे लोणी वापरू शकता. हे खाण्यास स्वादिष्ट आहे आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. (Butter face mask is extremely beneficial for the skin)

एवढेच नव्हे तर हे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. विशेष गोष्ट अशी आहे की हे त्वचेला लावल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही. पांढऱे लोणी कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई समृद्ध आहे. हे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते. फेस मास्क बनवण्यासाठी तुम्ही लोणी कसा वापरू शकता. ते आज आपण बघणार आहोत.

लोणी आणि केळीचा मास्क

एका वाडग्यात ताजे घरगुती लोणी घ्या आणि त्यात पिकलेली केळी मिसळा. या दोन गोष्टी मिसळून पेस्ट बनवा. आता हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि ते सुकू द्या. सुमारे 15 मिनिटांनी चेहरा धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. लोणी आणि केळी त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. ते तुमच्या त्वचेची चमक वाढवण्यासाठी काम करते.

लोणी आणि गुलाब पाणी

एका भांड्यात एक चमचा ताजे लोणी घेऊन त्यात गुलाबपाणी मिसळा. दही सारखी जाड पेस्ट तयार होईपर्यंत या दोन्ही गोष्टी फेटा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे अर्धा तास सोडा. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेस पॅक लावल्याने त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात. लोणी लावल्याने त्वचा कोरडी होत नाही. तर गुलाब पाणी त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते.

लोणी आणि काकडी

एका भांड्यात एक चमचा लोणी घ्या आणि दोन चमचे काकडीचा रस मिसळा. या दोन गोष्टी मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटांनी पाण्याने धुवा. जर तुम्हाला लालसरपणाची समस्या असेल तर तुम्ही ही पेस्ट लावू शकता. हा फेस पॅक लावल्याने त्वचेच्या रंगद्रव्याची समस्या दूर होते. काकडी त्वचेमध्ये हायड्रेटिंग एजंट म्हणून काम करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Butter face mask is extremely beneficial for the skin)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.