खोबरेल तेलामध्ये ‘हे’ घटक मिक्स करा आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करा!

खोबरेल तेलामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. अनेकदा लोक सतत मोबाईल, लॅपटॉपवर काम करत असतात, तासन्तास टीव्ही पाहतात, झोप कमी घेतात, जास्त काम करतात आणि हेल्दी डाएट सुद्धा फाॅलो करत नाहीत.

खोबरेल तेलामध्ये 'हे' घटक मिक्स करा आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करा!
त्वचेची काळजी

मुंबई : खोबरेल तेलामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. अनेकदा लोक सतत मोबाईल, लॅपटॉपवर काम करत असतात, तासन्तास टीव्ही पाहतात, झोप कमी घेतात, जास्त काम करतात आणि हेल्दी डाएट सुद्धा फाॅलो करत नाहीत. या सर्व कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात. जर तुम्हालाही काळी वर्तुळ्याची समस्या असेल आणि अनेक उपाय करूनही ते कमी होत नसेल तर तुम्ही खोबरेल तेल लावू शकता.

या तेलात काही गोष्टी मिसळल्यास डोळ्यांची काळी वर्तुळे दूर होतात. खोबऱ्याच्या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतात. ज्यामुळे काळी वर्तुळे दूर होतात. काळ्या वर्तुळांपासून सुटका हवी असेल तर खोबरेल तेलात या दोन गोष्टी मिसळून लावा आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करा.

खोबरेल तेल आणि हळद

खोबऱ्याच्या तेलामुळे काळ्या वर्तुळांसह त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. या तेलात थोडी हळद घाला आणि काळ्या वर्तुळांवर लावा आणि 15 मिनिटे सोडा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.

बदामाचे तेल आणि खोबरेल तेल

बदामाचे तेल अनेक त्वचेच्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. काळी वर्तुळे दूर करायची असतील तर खोबरेल तेलात बदामाच्या तेलाचे काही थेंब घाला. डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर लावा आणि तासभर राहू द्या. हे तेल तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लावू शकता. यामुळे डोळ्यांखालील काळ्या वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

खोबरेल तेल लावताना ही काळजी घ्या

नारळाचे तेल अशा प्रकारे लावा की ते तेल डोळ्यात जाणार नाही, अन्यथा हळदीमुळे जळजळ होऊ शकते. फक्त खोबरेल तेल लावा, इतर तेल नको. खोबरेल तेलाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. खोबरेल तेल केवळ केसांसाठीच नाही तर डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून किमान चार वेळा डोळ्यांखाली खोबरेल तेल लावा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss |  ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

 

(Coconut oil is beneficial in eliminating the problem of dark circles)

Published On - 11:38 am, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI