Skin Care : आयब्रो केल्यानंतर पुरळची समस्या निर्माण होते? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

सुंदर दिसण्यासाठी महिला आयब्रोला शेप देतात. साधारण आयब्रो दर 15 दिवसांनी केल्या जातात. आयब्रो तुमच्या चेहऱ्याचा आकार पूर्णपणे बदलतात. आयब्रोचा चांगला आकार लुक वाढवण्यास मदत करतो. काही लोकांची त्वचा अधिक संवेदनशील असते. ज्यामुळे आयब्रो काढताना जास्त वेदना होतात.

Skin Care : आयब्रो केल्यानंतर पुरळची समस्या निर्माण होते? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
आयब्रो
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 4:17 PM

मुंबई : सुंदर दिसण्यासाठी महिला आयब्रोला शेप देतात. साधारण आयब्रो दर 15 दिवसांनी केल्या जातात. आयब्रो तुमच्या चेहऱ्याचा आकार पूर्णपणे बदलतात. आयब्रोचा चांगला आकार लुक वाढवण्यास मदत करतो. काही लोकांची त्वचा अधिक संवेदनशील असते. ज्यामुळे आयब्रो काढताना जास्त वेदना होतात.

यासह चिडचिड, लालसरपणा आणि पुरळ आहे. काही लोकांना आयब्रो केल्यावर पुरळ येते. बऱ्याच वेळा आयब्रो केल्यावर मुरूमाची समस्या देखील वाढते. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे आयब्रो केल्यानंतर कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

बर्फाने मसाज

जर तुम्हाला देखील आयब्रो केल्यावर पुरळ येत असेल तर बर्फाचा तुकडा लावून लगेच आयब्रोची मालिश करा. असे केल्याने मुरुम, पुरळ आणि त्वचेची जळजळ कमी होऊ शकते.

कच्चे दूध

दुधात प्रथिने असतात. जी थ्रेडिंगमुळे होणारी जळजळ, लालसरपणा आणि सूज कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, कच्चे दूध त्वचेची जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. तुम्ही ते कापसाच्या मदतीने देखील लावू शकता. कच्चे दूध त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

गरम टॉवेल

जर तुम्हाला आयब्रो केल्यानंतर त्रास होत असेल तर तुम्ही टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि आयब्रोवर काही वेळ मसाज करा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. वेदना कमी आणि लालसरपणाच्या समस्येपासून सुटका होईल.

कोरफड जेल

त्वचेची समस्या दूर करण्यासाठी कोरफड जेल लावा. जर तुम्ही आयब्रो केल्यावर चिडचिड, लालसरपणा आणि मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर कोरफड जेल लावा. हे मुरुम आणि पुरळ कमी करण्यास मदत करते.

टोनर

टोनर त्वचा थंड करण्याचे काम करते. आयब्रो केल्यावर सूज आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते. टोनर त्वचेचे छिद्र बंद करते जे थ्रेडिंगनंतर उघडले जाते.

मेकअप लावू नका.

थ्रेडिंगनंतर आपल्या त्वचेची रोम छिद्र उघडली जातात. त्यामुळे कमीतकमी 24 तास मेकअप किंवा क्रीम लावू नका. मेकअप केल्यास त्वचेच्या समस्या वाढतील. जर तुम्हाला पार्टी किंवा फंक्शनमध्ये जायचे असेल तर एक ते दोन दिवस आधी थ्रेडिंग करा.

ब्लिचचा वापर करू नका

थ्रेडिंग केल्यानंतर अजिबात ब्लीचचा वापर करू नका. असे केल्याने आपणास जळजळ आणि खाज सुटण्याची समस्या वाढू शकते. जर आपण ब्लीच केले, आणि त्या जागी खाज आल्यामुळे वारंवार हाताने खाजवले, तर मुरूमं येतात आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do this home remedy to get rid of the problem of acne after eyebrows)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.