AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ऑलिव्ह ऑईल, पुदिना आणि बेसन पीठाचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्यासाठी फायदेशीर!

पिंपल्स, बारीक रेषा, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्या पावसाळ्यात वाढतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्‍याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो.

Skin Care : ऑलिव्ह ऑईल, पुदिना आणि बेसन पीठाचा 'हा' फेसपॅक चेहऱ्यासाठी फायदेशीर!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 7:05 AM
Share

मुंबई : पिंपल्स, बारीक रेषा, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्या पावसाळ्यात वाढतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्‍याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु तरीही विशेष काही चांगला परिणाम मिळत नाही. आपल्याला त्वचेच्या समस्या दूर करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय देखील केले पाहिजेत .ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. (Face pack of olive oil and besan flour is beneficial for the face)

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण घरचे-घरी ऑलिव्ह ऑईल, पुदिना आणि बेसन पीठाचा फेसपॅक वापरू शकतात. हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने पावसाळ्याच्या हंगामातही एक ग्लो चेहऱ्याला येतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑईल, पुदिना आणि बेसन पीठ लागणार आहे. यासाठी सर्वात अगोदर ऑलिव्ह ऑईल 2 चमचे, पुदिन्याच्या पानांची तीन चमचे पेस्ट आणि एक चमचा पाणी लागणार आहे.

वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. जर पेस्ट जास्त कोरडी वाटत असेल तर त्यामध्ये पाणी मिक्स करा. आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण साधारण आठवड्यातून दोन वेळा लावू शकता. मुलतानी माती, काकडी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला 1 चमचा मुलतानी माती, 2 काप काकडी आणि 3 चमचे गुलाब पाणी लागणार आहे. फेसपॅक तयार करण्यासाठी काकडीची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Face pack of olive oil and besan flour is beneficial for the face)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.