Hair Care Tips : सुंदर आणि निरोगी केसांसाठी ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा!

Hair Care Tips : सुंदर आणि निरोगी केसांसाठी 'या' सोप्या टिप्स फॉलो करा!
केसांची काळजी घेण्यासाठी हे उपाय करा.
Image Credit source: TV9

सुंदर आणि निरोगी केसांसाठी केसांची काळजी (Hair Care) घेणे आवश्यक आहे. केसांची योग्य काळजी न घेतल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केस मजबूत ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहारही (Healthy diet) खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या आहारात पोषक तत्वांनी समृद्ध पदार्थांचा समावेश करा.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 17, 2022 | 11:34 AM

मुंबई : सुंदर आणि निरोगी केसांसाठी केसांची काळजी (Hair Care) घेणे आवश्यक आहे. केसांची योग्य काळजी न घेतल्याने केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केस मजबूत ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहारही (Healthy diet) खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या आहारात पोषक तत्वांनी समृद्ध पदार्थांचा समावेश करा. सुंदर केस मिळवण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. याशिवाय तुम्ही नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवलेले घरगुती हेअर पॅक (Hair pack) देखील वापरू शकता.

  1. -केस विंचरण्यासाठी नेहमी लाकडी कंगवा वापरा. हे स्कॅल्पचे स्क्रॅचच्या धोक्यापासून संरक्षण करते. हे केस तुटण्यापासून देखील वाचवते. त्यामुळे टाळूवरची खाजही कमी होते. तसेच केसांची वाढ जलद होण्यास मदत होते. यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नेहमीच लाकडी कंगवा वापरा.
  2. -आठवड्यातून एकदा केसांना गरम तेलाने मसाज करा. हे तुमचे केस निरोगी आणि चमकदार बनवण्याचे काम करते. हे निरोगी केस राखण्यास मदत करते आणि केस फास्ट वाढण्यासही मदत होते. मात्र, आठ दिवसांमधून एकदाच केसांना गरम तेलाने मसाज करा.
  3. -हेअर ड्रायरसारखी साधने वापरणे टाळा. नियमितपणे हे वापरल्याने हळूहळू केस खराब होतात. त्यामुळे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होण्याची शक्यता असते.
  4. -नियमित तेल लावल्याने केस सुंदर होतात. हाताला तेल लावा आणि काही वेळ मसाज करा. 10 ते 15 मिनिटे टाळूची मालिश करा. केसांना नियमित तेल लावल्याने त्यांची चमक आणि आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.

संंबंधित बातम्या : 

Weight Loss: चरबी बर्न करण्यासाठी ‘या’ ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करा आणि शरीर निरोगी राहा!

Safe Holi : होळीचं रंग बेरंग होऊ नये, यासाठी रंग खेळताना नेमकी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें