तुम्हालाही सुंदर आणि तजेलदार त्वचा हवीय? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा !

प्रत्येक मुलीला खूप सुंदर दिसण्याची इच्छा असते. परंतु, सौंदर्य केवळ मेकअप आणि कपड्यांमधूनच येत नाही.

तुम्हालाही सुंदर आणि तजेलदार त्वचा हवीय? 'हे' घरगुती उपाय नक्की करुन पाहा !
सुंदर त्वचा

मुंबई : प्रत्येक मुलीला खूप सुंदर दिसण्याची इच्छा असते. परंतु, सौंदर्य केवळ मेकअप आणि कपड्यांमधूनच येत नाही, तर यासाठी त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसणे देखील महत्वाचे आहे. जर, त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही. मुळात आपली त्वचाच तजेलदार आणि सुंदर असणे आवश्यक असते. चला तर, त्वचा सुधारण्यासाठीच्या काही नैसर्गिक टिप्स जाणून घेऊया…(Follow these tips if you want glowing skin)

-चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेल फायदेशीर आहे. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं. तसेच ब्लॅकहेड्सची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी बदामाचे तेल, बदाम पेस्ट किंवा बदामाचे दुधाचा वापर आपण करू शकता. यासाठी काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भिजलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

-सकाळी आणि संध्याकाळी तिळाचे तेल चेहऱ्याला लावल्यास त्वचेला आर्द्रता मिळते. थंडींच्या दिवसात चेहऱ्यावर तिळाचे तेल लावल्याने त्वचेवर चमक येते. चेहऱ्यावर तिळाचे तेल लावून, 5 मिनिटानंतर चेहऱ्यावर तांदूळाचे पिठ लावून स्क्रब करा. स्क्रब केल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि काही काळाने चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा. यामुळे तुमची त्वचा कोमल होईल. तिळाच्या तेलामध्ये मुलतानी माती आणि हळद मिसळून हा फेस मास्क 30 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि सन टॅनपासूनही बचाव होईल.

-हळद अँटीबॅक्टेरीयल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. यातील पोषण तत्त्व कोलेजनचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. बेसनमध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिक्स करा. दूध टाकून पेस्ट तयार करा जर तुमच्याकडे गुलाब जल असेल तर या पेस्टमध्ये गुलाब जल मिक्स करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

-मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाण्यात, ऑलिव्ह ऑईल मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. दीड तासानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होईल. केळी आणि खोबरेल तेलाचा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एका वाडग्यात केळी मॅश करावी लागतील. या केल्याच्या मिश्रणात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. कोरडा झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

संबंधित बातम्या : 

(Follow these tips if you want glowing skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI