Hair Care Tips : पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा, वाचा !

या हंगामात केस गळती अधिक होण्याची शक्यता असते. कारण या हंगामात जास्त आर्द्रतेमुळे केस तुटू लागतात. म्हणूनच आपण या हंगामात आपल्या केसांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात

Hair Care Tips : पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा, वाचा !
सुंदर केस
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 12:31 PM

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याबरोबरच केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. या हंगामात केस आणि त्वचा संबंधित समस्या वाढतात. या हंगामात केस गळती अधिक होण्याची शक्यता असते. कारण या हंगामात जास्त आर्द्रतेमुळे केस तुटू लागतात. म्हणूनच आपण  आपल्या केसांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी हे आज आपण बघणार आहोत. (Follow these tips to take care of your hair in the rainy season)

ओले केस विंचरणे

बऱ्याचदा घाईघाईत आपण ओले केस विंचरतो. केस पातळ होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. ओले केस विंचरल्याने ते अधिक तुटतात. त्यासाठी तुम्ही केस ओले असताना ते हाताच्या बोटांनी मोकळे करा त्यानंतर टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्या आणि त्यानंतर थोडे सुकू द्या. सुकल्यावरच केसांवरून कंगवा फिरवा.

गरम तेलाने मालिश करा

केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. तेल कोरड्या टाळूचे पोषण करण्याशिवाय हे केस मजबूत आणि चमकदार राहण्यास मदत करते. केस धुण्या अगोदर एक तास अगोदर हलक्या हाताने गरम तेलाने केसांची मालिश करा.

शॅम्पू आणि कंडिशनर

केस स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केस धुणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अँटी-बॅक्टेरिया शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. कारण यावेळी बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. शॅम्पूनंतर कंडिशनर आठवणीने लावा. शक्यतो कंडिशनर चांगल्या कंपनीचे असावे.

ताणताणाव

सतत काम आणि ऑफिस या सगळ्यामध्ये आपण तणावात असतो. पण हाच तणाव आपले केस पातळ करण्यासाठी कारणीभूत ठरतो. बऱ्याच गोष्ट तणावामुळे बिघडत असतात. त्यामुळे शक्यतो तणाव न घेणेच शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. त्यामुळे नेहमी शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

केसांना मॉइश्चराइज्ड ठेवा

पावसाळ्यात केसांची निगा राखणे खूप महत्वाचे असते. आपण सीरम वापरू शकता, जे आपल्या केसांना उष्णतेपासून वाचवेल. हे केसांना मॉइश्चरायझेशन करण्यास देखील मदत करेल. नेहमी एक मॉइश्चरायझर निवडा जे आपल्या केसांना हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ ठेवण्यास मदत करेल.

केस रगडून धुणे

केस हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. बऱ्याचदा केस धुताना मुळाशी घासून धुतले जातात. मुळांना इजा झाल्याने केस तुटतात आणि परिणामी केस पातळ होतात. केसांना आठवड्यातून तीन वेळा शॅम्पू आणि कंडिशनर हे करायलाच हवे. पण हे करत असातना केसांची काळजी घेणे गरजेचे असते. शॅम्पू लावल्यानंतर केसांना हलक्या हातांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केला तर, केसांना योग्य पोषण मिळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Follow these tips to take care of your hair in the rainy season)

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.