Pregnancy Skin Care : गरोदरपणात त्वचेवर या गोष्टी लावणे टाळा, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते!

कोणत्याही महिलेसाठी गर्भधारणा हा एक सुंदर क्षण असतो. या दरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. हे बदल शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या होतात. शरीरातील बदलांचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो.

Pregnancy Skin Care : गरोदरपणात त्वचेवर या गोष्टी लावणे टाळा, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते!
गर्भधारणेदरम्यान त्वचेची काळजी

मुंबई : कोणत्याही महिलेसाठी गर्भधारणा हा एक सुंदर क्षण असतो. यादरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. हे बदल शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या होतात. शरीरातील बदलांचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो. या दरम्यान, त्वचेला पुरळ, खाज आणि रंगद्रव्यासह इतर त्वचेच्या समस्यांमधून जावे लागते. मात्र, त्वचेतील हे बदल काही काळासाठी होतात. (Follow these tips to take care of your skin during pregnancy)

सॅलिसिलिक अॅसिड

गर्भधारणेदरम्यान सॅलिसिलिक अॅसिड असलेली औषधे किंवा क्रिम वापरू नका. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे बाळासाठी हानिकारक असू शकतात. बहुतेक त्वचेच्या काळजी उत्पादनांमध्ये सॅलिसिलिक अॅसिड गुणधर्म असतात. क्लींझर, बॉडी वॉश, सीरम, लोशन सारखी उत्पादने बनवण्यासाठी वापरली जाते.

हायड्रोक्विनोन

हे एक प्रिस्क्रिप्शन उत्पादन आहे. जे त्वचेचे रंगद्रव्य कमी करण्यासाठी वापरले जाते. मात्र, हायड्रोक्विनोनचे जास्त प्रमाण शरीराद्वारे शोषले जाते आणि त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून, गर्भधारणेदरम्यान याचा जास्त वापर करू नये.

रासायनिक सनस्क्रीन

बाजारात अनेक सनस्क्रीन आहेत. ज्यात हानिकारक रसायने वापरली जातात. हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्याचे काम सनस्क्रीन करते. या सनस्क्रीनमध्ये ऑक्सीबेनझोन नावाचे रसायन असते. जर तुम्ही गरोदरपणात त्याच्या संपर्कात आलात तर त्याचा तुमच्या हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो.

बेंझॉयल पेरोक्साइड

गर्भधारणेदरम्यान या रसायनापासून बनवलेल्या गोष्टी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे रसायन गरोदरपणात त्वचेसाठी हानिकारक आहे. यामुळे उच्च रक्त प्रवाह आणि त्वचेवर जळजळ होते. कोणत्याही प्रकारची त्वचा उत्पादने लागू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips to take care of your skin during pregnancy)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI