Hair Care | केसांना मजबूत बनवायचेय? मग, शुद्ध तुपाने करा केसांचा मसाज, वाचा याचे फायदे

केसांच्या आरोग्यासाठी तूप अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. आपल्या स्काल्पला तुपाने मालिश केल्याने, ते आपल्या स्काल्पला नैसर्गिक ओलावा देते आणि केसांच्या मुळांना बळकट करते.

Hair Care | केसांना मजबूत बनवायचेय? मग, शुद्ध तुपाने करा केसांचा मसाज, वाचा याचे फायदे
तूप
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 1:17 PM

मुंबई : भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात तूप वापरले जाते. लोक त्याचा अनेक प्रकारे वापर करतात. अन्नाची चव वाढवण्यासाठी ते चपातीवर लावण्यासाठी किंवा डाळीची खमंग चव वाढवण्यासाठी तूप वापरले जाते. तूप ही स्वयंपाक घरातील एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. आरोग्यासाठीही तूप अगदी फायदेशीर मानले जाते. तूपात भरपूर पोषकद्रव्ये आढळतात, ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा अनेक प्रकारे फायदा होतो (Hair Care tips Using Pure Ghee).

तथापि, असे बरेच लोक आहेत जे तूप खाण्यास टाळाटाळ करतात. यामुळे त्यांचे वजन वाढेल, असा त्यांचा विश्वास आहे. पण हे जाणून घ्या की, तूप वापरण्याचे तोटे कमी आहेत आणि त्याचे फायदे खूप जास्त आहेत.

तूपाचे असे बरेच महत्त्वपूर्ण फायदे आहेत, परंतु आपल्याला माहित आहे का की, तूप सौंदर्य वाढवण्यासाठी देखील वापरले जाते. केसांच्या आरोग्यासाठी तूप अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. आपल्या स्काल्पला तुपाने मालिश केल्याने, ते आपल्या स्काल्पला नैसर्गिक ओलावा देते आणि केसांच्या मुळांना बळकट करते. तूप वापरल्याने केस गळती देखील थांबेल. तूप आपले केस चमकदार देखील बनवते आणि त्याशिवाय तुपाचे इतरही बरेच फायदे आहेत, जे आपल्याला कदाचित माहितही नसतील…

केसांना तुपाने मालिश करण्याचे फायदे :

– जर आपले केस दुतोंडी अर्थात फुटू लागले असतील, त. यामुळे आपल्या केसांची वाढ देखील थांबते. म्हणून आपण दररोज आपल्या केसांवर तूप लावून मसाज करणे महत्वाचे आहे (Hair Care tips Using Pure Ghee).

– कोंडाच्या समस्येमध्ये देखील तूप खूप प्रभावी आहे. यासाठी तुपामध्ये बदाम तेल मिसळा आणि केसांच्या मुळांवर मसाज करा. यामुळे, काही काळातच कोंडा होण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

– जर आपले केस मऊ आणि चमकदार बनवायचे असतील, तर तूपात ऑलिव्ह तेल मिसळा आणि केसांवर मालिश करा.

– जर आपले केस कोरडे व निर्जीव वाटत असतील, तर तूप यामध्ये खूप उपयुक्त ठरू शकेल. यासाठी आपल्या केसांना हलक्या गरम केलेल्या तुपाने मसाज करा आणि नंतर लिंबाचा रस लावा. अर्ध्या तासानंतर आपले केस स्वच्छ धुवा.

– जर तुम्हाला केस लांबसडक करायचे असतील, तर मग तुपामध्ये आवळा किंवा कांद्याचा रस मिसळून केसांची मालिश करा. यामुळे तुमचे केस जलद गतीने वाढू लागतील.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Hair Care tips Using Pure Ghee)

हेही वाचा :

Raisins | दररोज प्या मनुक्याचे पाणी, शरीराला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे!

Hair Care | गर्भावस्थेदरम्यान केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा ‘या’ खास टिप्स…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.