मध, चंदन पावडर आणि साखरेचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!

सध्याच्या या हंगामात अनेकांची त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण घरी काही फेसपॅक तयार करू शकता.

मध, चंदन पावडर आणि साखरेचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!
सुंदर त्वचा

मुंबई : सध्याच्या या हंगामात अनेकांची त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुम येतो. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण घरी काही फेसपॅक तयार करू शकता. यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होईल. हे फेसपॅक कसे तयार करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. विशेष म्हणजे हे फेसपॅक घरी तयार करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. (Honey and sugar face pack is beneficial for the skin)

तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मध, चंदन पावडर आणि साखरेचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी मध आणि चंदन पावडर मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये शेवटी साखर मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर त्वचेचा मसाज करा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून दोन वेळा लावला पाहिजे. हा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या चेहऱ्याला आणखी चमकदार बनवण्यासाठी आणि मुरुमांपासून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी आपण दोन चमचे चंदन पावडरमध्ये 2 ग्रॅम कापूर मिसळू शकता. आता त्यात एक चमचा गुलाब पाणी घाला आणि जाड पेस्ट बनवा. आता ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर लावा आणि 20 मिनिटे तशीच राहू द्या. पेस्ट पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर, आपण आपला चेहरा साध्या पाण्याने धुवावा.

चंदन आणि दुधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि तीन चमचे दुध घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेला लावा.  त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्यची समस्या दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक करण्यासाठी खूप सोप्पा असल्यामुळे आपण दररोज देखील हा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Honey and sugar face pack is beneficial for the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI