Hair Care Tips : चिकटपणामुळे केसांना तेल लावणं टाळताय? थांबा, आधी तेलाचे फायदे जाणून घ्या..

पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याविषयी ज्या प्रमाणात काळजी घेणे गरजेचे आहे, तितकीच काळजी आपल्याला आपल्या सौन्दर्याचीही घ्यायला हवी.

Hair Care Tips : चिकटपणामुळे केसांना तेल लावणं टाळताय? थांबा, आधी तेलाचे फायदे जाणून घ्या..
हेअर

मुंबई : पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची जशी काळजी घेणे गरजेचे आहे, तितकीच काळजी आपल्याला आपल्या सौन्दर्याची आणि केसांची घ्यावी लागते. केस देखील आपले सौंदर्य वाढवतात. पावसाळ्यात आपल्या केसांच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो. हवेतील वाढलेल्या आर्द्रतेचा केसांवर परिणाम होऊ शकतो. या हंगामात अनेकजण केसांना तेल लावणे टाळतात. (It is beneficial to apply oil on the hair daily)

ज्यामुळे आपल्या केसांच्या अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. बरेचजण दररोज फ्रेश लूकसाठी केसांना तेल लावत नाही. त्यामुळे केस रुक्ष होतात. केस रुक्ष झाल्याने ते कंगव्याने नीट विंचरता येत नाही आणि केस तुटतात. नियमित केस तुटल्याने तुम्हाला हळूहळू टक्कल पडायला लागते. त्यामुळे केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. तेल कोरड्या टाळूचे पोषण करण्याशिवाय हे केस मजबूत आणि चमकदार राहण्यास मदत करते.

केस धुण्या अगोदर एक तास अगोदर हलक्या हाताने गरम तेलाने केसांची मालिश करा.
खोबऱ्याचं तेल केवळ केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतं, असं नाही. आपल्या केसांवर कोमट खोबरेल तेल लावा, त्यानंतर डोक्यावर प्लॅस्टिक पिशवी घालून एका टॉवेलनं झाकून घ्या. नारळ तेल नैसर्गिक, किफायतशीर आणि सहज उपलब्ध होणारे आहे. केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे प्रभावी आहे.

शक्यतो रात्रीच्या वेळेस केसांवर ऑलिव्ह ऑईल लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी शॅम्पूने आपले डोके धुवा. हजारो वर्षांपासून आवळ्याचे अर्थात आमला तेल वापरले जाते. या तेलामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होतात. परंतु, जर आपल्या केसांत खाज सुटण्याची समस्या असेल किंवा आपल्या केसांमध्ये जास्त कोरडेपणा असेल, तर आमला तेल हानिकारक ठरू शकते. अशा लोकांनी आवळ्याच्या तेलाचा वापर टाळावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(It is beneficial to apply oil on the hair daily)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI