Skin Care : त्वचेला ‘हे’ घरगुती ब्लीच लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 06, 2021 | 10:28 AM

सुंदर आणि चमकदार त्वचा दिसण्यासाठी महिला नेहमीच ब्लीच करतात. ब्लीच केवळ चेहर्‍याचे सौंदर्यच वाढवत नाही तर फाईन लाईन, पिग्मेंटेशन यासारख्या बर्‍याच समस्या दूर करते.

Skin Care : त्वचेला 'हे' घरगुती ब्लीच लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
सुंदर त्वचा

मुंबई : सुंदर आणि चमकदार त्वचा दिसण्यासाठी महिला नेहमीच ब्लीच करतात. ब्लीच केवळ चेहर्‍याचे सौंदर्यच वाढवत नाही तर फाईन लाईन, पिग्मेंटेशन यासारख्या बर्‍याच समस्या दूर करते. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी ब्लीच अत्यंत फायदेशीर आहे. आपण जे बाजारातून ब्लीच आणते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रसायने वापरली जातात. आपल्या चेहऱ्याचे नुकसान होण्याची देखील शक्यता असते. (It is beneficial to apply this homemade bleach on the skin)

दही – चेहर्‍यावर दही लावल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास आणि त्वचा मॉइस्चराइज होण्यास मदत होते. बाजारातील ब्लीचमुळे आपल्या चेहऱ्यावर काही साइड इफेक्ट होत असतील तर आपण 10-15 मिनिटांसाठी चेहर्‍यावर दही लावा किंवा दह्यामध्ये बेसन पीठ मिक्स करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवा आणि यानंतर चेहऱ्याचा मसाज करा. ही पेस्ट एका ब्लीच प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर कार्य करते.

बेसन पीठ – दूध आणि हळदीची पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर पेस्ट कोरडी झाल्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण आठदिवसांमधून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्यावर लावली पाहिजे. यामुळे ब्लीच केल्यानंतर जसा ग्लो चेहऱ्यावर येतो. तसाच ग्लो ही पेस्ट लावल्यानंतर आपल्या त्वचेवर येईल.

लिंबू आणि मध – लिंबू आणि मध हे नैसर्गिक ब्लीच मानले जाते, कारण त्यात नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात, जे चेहर्‍याचे रंग उजळ करण्यासाठी कार्य करतात. आपण नैसर्गिक ब्लीच म्हणून देखील वापरू शकता. यासाठी मध आणि लिंबू चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा.

काकडी आणि पुदीना –  काकडी आणि पुदीना देखील ब्लिचसाठी खूप चांगले मानले जातात. यासाठी 200 ग्रॅम पुदीना पाने काकडीची पेस्ट बनवून त्यात लिंबाचा रस घाला. यानंतर, एक कप ग्रीन टी आणि तीन चमचे दही मिसळा आणि थंड होऊ द्या. आता ही पेस्ट चेहर्‍यावर चांगली लावा आणि हलक्या हाताने मालिश करुन सुकवू द्या. यानंतर ग्रीन टीने तोंड धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(It is beneficial to apply this homemade bleach on the skin)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI