Beauty Tips: हिवाळ्यातही त्वचेसाठी आवश्यक आहे सनस्क्रीन
आपली त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी थंडीच्या दिवसांमध्येही सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली: बऱ्याच लोकांना असं वाटतं की सनस्क्रीनचा (sun screen cream) वापर हा केवळ उन्हाळ्यात (summer) कडक उन्हापासून वाचण्यासाठी केला जातो. मात्र असे नाही. हिवाळ्यातही (winter) सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो, हे तुम्हाला माहीत आहे का ? अनेकदा लोकं हिवाळ्यात सनस्क्रीनचा वापर करत नाही. मात्र या ऋतूमध्येही सूर्याची किरणे आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यातही त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
धुक्यामुळेही होते टॅनिंग
हे वाचून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण सनस्क्रीनची जास्त गरज ही हिवाळ्यातच असते. उन्हाळ्यापेक्षा थंडीच्या दिवसांत ऊन जरा कमी असते. मात्र , एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, धुके आणि थंड वाऱ्यामुळे ही आपली त्वचा टॅन होऊ शकते . त्यामुळे थंडीच्या दिवसातही सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे.
त्वचेच्या कॅन्सरचा धोका
थंडीच्या दिवसांत आपल्याला उन्हा अथवा सूर्यकिरणांचा फारसा त्रास होत नसला तरी ही हानिकारक किरणे आपल्या त्वचेचे नुकसान करू शकतात. सूर्यकिरणांमुळे सनटॅन, सनबर्न किंवा काळे डाग पडू शकतात.
तसेच त्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचाही धोका असतो. विशेष म्हणजे थंडीच्या दिवसात ओझोनचा थर हा पातळ होतो, त्यामुळे सूर्यकिरणांमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये 30 APF चे सनस्क्रीन क्रीम लावणे गरजेचे आहे.
असा करावा वापर
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लावलेले सनस्क्रीन हे घाम आल्यामुळे निघून जाऊ शकते. तर थंडीच्या दिवसात सुटलेल्या गार वाऱ्यामुळे तुम्ही लावलेल्या सनस्क्रीन क्रीमचा परिणाम लवकर संपू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांत जर 3 तासांनी सनस्क्रीनचा वापर करता, तसेच थंडीतही त्याचा वापर करावा.
थंडीतही दर 3 तासांनी सनस्क्रीन लावावे. मात्र सनस्क्रीनचा वापर हा आपल्या त्वचेचा पोत काय आहे, ते पाहून त्याप्रमाणे करावा. काही वेळा सनस्क्रीनच्या अतीवापरामुळे पिंपल्स किंवा फोड येणे अथवा त्वचेला ॲलर्जी होण्याचा धोका असतो.
