AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुटकुळ्यांमुळे घरातून बाहेर पडणं अवघड झालंय? पतंजलीची ही औषधे घ्या; इतक्या दिवसात मिळेल आराम

पतंजलीने सात दिवसांत चेहऱ्यावरील पुटकुळ्या काढून टाकणारे आयुर्वेदिक औषध, "दिव्य कांति लेप" आणि "नीम घन वटी," लाँच केले आहे. हे औषध नैसर्गिक जडीबुटींनी बनलेले असून त्यात कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. संशोधनातून या औषधाच्या प्रभावीपणाची पुष्टी झाली आहे.

पुटकुळ्यांमुळे घरातून बाहेर पडणं अवघड झालंय? पतंजलीची ही औषधे घ्या; इतक्या दिवसात मिळेल आराम
patanjali Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 31, 2025 | 5:24 PM
Share

तुम्हीही चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या पुटकुळ्यांमुळे त्रस्त आहात आणि महागडे ब्यूटी प्रोडक्ट्स वापरून थकला आहात तर आता चिंता करायची गरज नाही. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने एक असं औषध तयार केलंय जे अवघ्या सात दिवसात चेहऱ्यावरील पुटकुळ्या गायब करतं. हे औषध केवळ परिणामकारकच नाही तर त्याने कोणताही साईड इफेक्ट्स होत नसल्याचं एका संशोधनातून दिसून आलं आहे. चेहऱ्यावरील मुरुम वगैरे मुळापासून हे औषध काढून टाकतं, असा दावाही करण्यात आला आहे.

पतंजलीचं हे औषध मुख्यत्वे एक आयुर्वेदिक स्किन केअर प्रोडक्ट आहे. ‘दिव्य कांति लेप’ आणि ‘नीम घन वटी’ असं या औषधांची नावे आहेत. ‘दिव्य कांति लेप’ हे एक हर्बल पेस्ट आहे. ते चेहऱ्याला लावले जाते. तर ‘नीम घन वटी’ ही एक गोळी असून ती खायची आहे. या दोन्ही औषधांमुळे त्वचा आतून आणि बाहेरून स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे पुटकुळ्यांची समस्या कमी होते. यात नैसर्गिक आणि आयुर्वेदिक जडी बुटींचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे स्किन आतून साफ करून पुटकुळ्या मुळापासून निघून जातात.

संशोधनातून खुलासा…

अलीकडेच पतंजली आयुर्वेद संस्थेने केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, ज्यांनी ही औषध सात दिवस नियमितपणे घेतली, त्यांचं चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांचं प्रमाण जवळजवळ पूर्णपणे कमी झालं. विशेष म्हणजे, या कालावधीत कोणत्याही रुग्णाला कोणतेही साइड इफेक्ट्स जाणवले नाहीत. चेहऱ्यावरील डाग-धब्बे कमी झाले आणि त्वचा पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ व तेजस्वी दिसू लागली. चला तर पाहूया, या औषधात कोणकोणत्या आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

कडुनिंब : त्वचा स्वच्छ करते आणि जीवाणूंना नष्ट करते.

गिलोय: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

त्रिफळा : शरीर डिटॉक्स करण्यात मदत करते आणि रक्त शुद्ध करते.

मंजिष्ठा : त्वचेचा नैसर्गिक तेज वाढवते आणि डाग-धब्बे कमी करते.

हळद: अँटी-बॅक्टेरियल असून सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात.

कसा करावा वापर?

या गोळ्या दिवसातून दोन वेळा, जेवणानंतर पाण्यासोबत घ्याव्यात. त्याचबरोबर त्वचेची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही बाहेर जात असाल तर चेहरा स्वच्छ करूनच औषध घ्या. आहारही संतुलित असावा. अधिक तळलेले, मसालेदार व तेलकट अन्न टाळा.

कोण घेऊ शकतो हे औषध?

हे औषध पूर्णपणे आयुर्वेदीक आहे, त्यामुळे 16 वर्षांवरील कोणीही याचा वापर करू शकतो. परंतु जर कोणाला पूर्वीपासून त्वचेची अ‍ॅलर्जी, हार्मोनल समस्या किंवा कोणतीही गंभीर व्याधी असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.