Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits of Rice Water : तांदळाचे पाण्याचा वापर करून मिळवा सुंदर त्वचा; क्लिन्झरपासून टोनरपर्यंत होतो याचा वापर!

तांदळाचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. तुम्ही तांदळाचे पाणी क्लिन्झर, टोनर, सीरम इत्यादी म्हणून देखील वापरू शकता. येथे जाणून घ्या, तांदळाच्या पाण्याचे फायदे आणि ते कसे वापरावे.

Benefits of Rice Water : तांदळाचे पाण्याचा वापर करून मिळवा सुंदर त्वचा; क्लिन्झरपासून टोनरपर्यंत होतो याचा वापर!
तांदळाचे पाण्याचा वापर करून मिळवा सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 4:30 PM

तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. तांदळाचे पाणी (Rice water) त्यापैकीच एक. तांदळात प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक गोष्टी असतात, ज्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. याच्या वापराने तुमच्या त्वचेला पोषण मिळते. तसेच त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर (problem away) होतात. तांदळाचे पाणी तुमच्या त्वचेचे छिद्र साफ करते, त्यामुळे मुरुमा सारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय तांदळाच्या पाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या (Wrinkles on the face) येत नाही आणि त्वचेला एकप्रकारचा घट्टपणा येतो. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर म्हातारपणाचा प्रभाव लवकर दिसत नाही. तुम्ही तांदळाचे पाणी क्लिन्झर, टोनर, सीरम इत्यादी म्हणून देखील वापरू शकता. येथे जाणून घ्या, तांदळाच्या पाण्याचे फायदे आणि ते कसे वापरावे.

त्वचा स्वच्छ ठेवते

जर तुम्हाला तांदळाचे पाणी क्लिंजर म्हणून वापरायचे असेल तर, प्रथम तुम्हाला ते तयार करावे लागेल. तांदळाचे पाणी तयार करण्यासाठी तांदळात पाणी टाकून गॅसवर ठेवा आणि उकळू द्या, हे पाणी घट्ट झाल्यावर गाळून घ्या. थंड झाल्यावर, एका हवाबंद डब्यात एक आठवडा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि क्लिंझर म्हणून वापरा. क्लींजर म्हणून वापरत असताना, तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यानंतर साधारण 10 मिनिटे हलक्या हातांनी मसाज करा.

फेस पॅक

जर तुम्हाला तांदळाच्या पाण्याचा फेस पॅक वापरायचा असेल, तर कोरफडीचे जेल, लिंबाचा रस आणि थंड तांदळाचे पाणी मिक्स करून चेहऱ्यावर वापरा. काही वेळ चेहऱ्यावर मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर राहू द्या. कोरडे झाल्यानंतर चेहरा धुवा.

हे सुद्धा वाचा

सीरम

तुम्ही तांदळाचे पाणी फेस सीरम म्हणून देखील वापरू शकता. यासाठी तांदळाच्या पाण्यात कोरफडीचे जेल आणि व्हिटॅमिन ई तेल मिसळा. याचा नियमितपणे चेहऱ्यावर वापर करा. खूप परिणाम होईल.

टोनर

तांदळाच्या पाण्यात गुलाबपाणी मिसळून स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट धुवा आणि स्वच्छ टॉवेलने पुसून टाका. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर स्प्रे करा. हे एक उत्तम टोनर म्हणून काम करेल.

बर्फाचे तुकडे

तुमचा चेहरा हायड्रेट आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी तुम्ही बर्फाचे तुकडे देखील वापरू शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला तांदळाचे पाणी तयार करावे लागेल आणि ते बर्फाच्या तुकड्यांमध्ये टाकून गोठवावे लागेल. यासाठी तुम्ही चेहऱ्यावर हे क्यूब्स वापरू शकता.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.