Skin care : ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा !

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण हजारो रुपये पार्लरमध्ये खर्च करतो, महागडी सौंदर्य उत्पादने वापरतो. त्वचा सुंदर मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. विशेष म्हणजे घरगुती उपाय केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत.

Skin care : 'हे' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा !
सुंदर त्वचा

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण हजारो रुपये पार्लरमध्ये खर्च करतो, महागडी सौंदर्य उत्पादने वापरतो. त्वचा सुंदर मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. विशेष म्हणजे घरगुती उपाय केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. घरगुती उपाय केल्याने मुरुम, काळे डाग, वृद्धत्वाची लक्षणे आपल्या चेहऱ्यावरून गायब होण्यास मदत होते. (Special face pack to get beautiful skin)

हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला हळद, दही, कोरफड आणि गुलाब पाणी लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे. यामुळे आपली त्वचा सुंदर होते.

फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा संत्र्याच्या पावडर घ्या त्यामध्ये दही व्यवस्थितपणे मिक्स करा. ही पेस्ट साधारण 20 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा धुवा हि प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा केली तर तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. त्वचा तेलकट असल्यास एका वाटीमध्ये संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि चंदन पावडर एकत्र घ्या व फेस पॅक तयार करा. या पॅकमुळे तेलकट त्वचेवरील मुरुमांची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते.

तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काही वेळाने धुवून टाका. यामुळे आपली त्वचा सुंदर होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Special face pack to get )