Baldness or Hair Loss Problem: ऐन तारुण्यात डोक्यावरचे केस जात आहेत?; ‘हे’ उपाय कराच!

दररोज 50 ते 100 केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जर आपले केस यापेक्षा जास्त गळत असतील तर आपण त्याकडे लगेचच लक्ष देणे आवश्यक आहे.

Baldness or Hair Loss Problem: ऐन तारुण्यात डोक्यावरचे केस जात आहेत?; 'हे' उपाय कराच!
केसांचे टक्कल पडणे

मुंबई : दररोज 50 ते 100 केस गळणे हे सामान्य आहे, परंतु जर आपले केस यापेक्षा जास्त गळत असतील तर आपण त्याकडे लगेचच लक्ष देणे आवश्यक आहे. कारण आजकाल लोकांना लहान वयात टक्कल पडण्याची समस्या भेडसावत आहे. विशेषतः कपाळावरील केस खूप वेगाने गळतात आणि टक्कल पडते. (Take 9 home remedies to get rid of hair loss)

याचे प्रमुख कारण म्हणजे प्रदूषण, प्रक्रियायुक्त अन्न, मध्यपान, धूम्रपान, चुकीचा आहार, संप्रेरक असंतुलन, थायरॉईड आणि आैषधांचा भडिमार हे आहे. कधीकधी हे जास्त ताण घेतल्यामुळे किंवा आनुवंशिकतेमुळे होते. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काही टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत. ज्यामुळे टक्कल पडण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

1. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला पाैष्टीक अन्नाची आवश्यकता असते, त्याच प्रकारे आपल्या केसांनाही तेलाद्वारे शक्ती आणि पोषण मिळते. म्हणून आठवड्यातून किमान दोनदा केसांना तेल लावा.

2. कढईत नारळ तेल गरम करा. त्यात व्हिटॅमिन ईचे 5 ते 6 कॅप्सूल घाला आणि कापूर मिसळा. सर्वकाही एकत्र गरम करा. त्यानंतर या तेलाने केसांची मालिश करा. हे तेल लावल्याने केस गळती कमी होईल.

3. आजकाल मुली केसांना घट्ट बांधतात. मात्र, केसांना घट्ट बांधणे चुकीचे आहे. कारण यामुळे मुळांपासून केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटतात.

4. टाळूवर तेलाच्या मालिश दरम्यान आपल्या केसांची मुळे चोळण्यापासून टाळा आणि केस पिळणे आणि केस खेचणे देखील टाळा.

5. केसांचे स्ट्रेटेनर्स, फ्लो ड्रायर किंवा इतर हीटिंग टूल्स वापरणे थांबवा. यामुळे केस कमकुवत होतात आणि ब्रेक होऊ लागतात.

6. याशिवाय रंग, ब्लीचिंग एजंट्स आणि इतर रसायने असलेल्या वस्तू वापरू नका. ते आपल्या केसांचे बरेच नुकसान करतात.

7. झोपेचा अभाव ताणतणाव निर्माण करतो. तर तणाव टाळण्यासाठी 8 तासांची संपूर्ण झोप घ्या आणि ध्यान करा.

8. आपल्या आहाराचा केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. आपण आपल्या आहारात नियमितपणे पालेभाज्या, फळे, रस, दही, ताक, अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करावा आणि जास्त तळलेले आणि जंकफूड खाणे टाळावे.

9. स्वत: ला चांगले हायड्रेटेड ठेवा आणि भरपूर पाणी प्या. थायरॉईडसारख्या समस्येमुळे असे होत असेल तर तज्ञांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Take 9 home remedies to get rid of hair loss)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI