AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : गुडघे आणि कोपर स्वच्छ करण्यासाठी 3 सर्वोत्तम घरगुती उपचार, वाचा याबद्दल अधिक! 

आपण सर्वचजण त्वचेची विशेष काळजी घेतो. त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी आपण विविध साैदर्य उत्पादने वापरतो. मात्र, आपण हाताच्या कोपऱ्यांकडे आणि पायांच्या गुडघ्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे हे काळपट आणि जाड त्वचा होते. आपण जसे त्वचेकडे लक्ष देतो, तसेच आपण हाताच्या कोपऱ्याकडे आणि पायांच्या गुडघ्याकडे देखील लक्ष दिले पाहिजेत.

Skin Care : गुडघे आणि कोपर स्वच्छ करण्यासाठी 3 सर्वोत्तम घरगुती उपचार, वाचा याबद्दल अधिक! 
काळपटपणा
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 7:44 AM
Share

मुंबई : आपण सर्वचजण त्वचेची विशेष काळजी घेतो. त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी आपण विविध साैदर्य उत्पादने वापरतो. मात्र, आपण हाताच्या कोपऱ्यांकडे आणि पायांच्या गुडघ्याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे हे काळपट आणि जाड त्वचा होते. आपण जसे त्वचेकडे लक्ष देतो, तसेच आपण हाताच्या कोपऱ्याकडे आणि पायांच्या गुडघ्याकडे देखील लक्ष दिले पाहिजेत.  गुडघे आणि कोपराचा काळपटपणा काढण्यासाठी आज आम्ही काही खास घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

लिंबू

लिंबूमध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत. फक्त एक लिंबू घ्या, तो अर्धा कापून घ्या थोडासा रस पिळून घ्या आणि त्यांचा वापर आपल्या कोपर आणि गुडघ्यांना घासण्यासाठी करा. सुमारे 15 मिनिटे सोडा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. तुम्हाला हव्या तितक्या वेळा तुम्ही हे करू शकता. तुमचे आवडते मॉइश्चरायझर घ्या आणि ते नियमितपणे लावा. यामुळे कोपरावर आणि गुडघ्यावरील काळपटपणा दूर होण्य़ास मदत होईल.

हळद

हळद हा एक सुपरहाऊस घटक आहे. जो पारंपारिकपणे त्वचा उजळण्यासाठी वापरला जातो. त्यात कर्क्यूमिन असते जे मेलेनिनचे अति उत्पादन नियंत्रित करते. 2 टिस्पून बेसन आणि 1 टिस्पून हळद 1 टिस्पून दही बरोबर घ्या. त्यांना पेस्टमध्ये मिसळा आणि 20 मिनिटांसाठी आपल्या गुडघ्यावर लावा. काही वेळ मसाज करा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

बेकिंग सोडा

दुधामध्ये बेकिंग सोडा मिसळून जाड पेस्ट बनवा. आपल्या कोपर आणि गुडघ्यावर पेस्ट लावा आणि पाच मिनिटांनंतर धुवा. आपण आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावली पाहीजे. यामुळे गुडघ्याची त्वचा मऊ होण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑइल

दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करुन हे मिश्रण गुडघ्यांवर लावावं. त्यानंतर थोडावेळ त्याने स्क्रब करा. पाच मिनिटे ही पेस्ट अशीच गुडघ्यांवर ठेवून नंतर धुवून टाकावी. यामुळे तुमच्या कोपऱ्यावरील आणि गुडघ्यांवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(These 4 home remedies are beneficial for cleansing the knees and elbows)

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.