Hair Care : कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा!

हिवाळ्यामध्ये केसांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होते. अशावेळी केसांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण जे शॅम्पू वापरतो ते रसायनिक असतात. ज्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही कोरड्या केसांसाठी घरगुती शॅम्पू देखील वापरू शकता. यामुळे केस मऊ होण्यास मदत होईल.

Hair Care : कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा!
केसांची काळजी
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 8:11 AM

मुंबई : हिवाळ्यामध्ये केसांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होते. अशावेळी केसांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण जे शॅम्पू वापरतो ते रसायनिक असतात. ज्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही कोरड्या केसांसाठी घरगुती शॅम्पू देखील वापरू शकता. यामुळे केस मऊ होण्यास मदत होईल. घरगुती शैम्पू केस स्वच्छ करण्यासाठी, कोरडेपणा आणि निस्तेजपणावर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहेत.

कोरफड केसांसाठी अत्यंत फायदेशीर

कोरफडमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. जे तुमचे केस मऊ ठेवण्यास मदत करतात. कोरफडमध्ये जीवनसत्त्वे, अमीनो अॅसिड, खनिजे, फॅटी अॅसिड भरपूर असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी फायदेशीर असतात. यासाठी तुम्हाला खोबरेल तेल – 1/2 कप, कोरफड जेल – 1 कप आणि तेलाचे काही थेंब लागतील. सर्व साहित्य एका भांड्यात ठेवा आणि फेटून घ्या. आपले केस ओले करा आणि नंतर आपल्या हातावर शैम्पू घ्या आणि आपल्या टाळूची मालिश करा. यामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास नक्की मदत होईल.

कोरफड आणि खोबरेल तेल हेअर मास्क आपल्या केसांची चमक राखण्यासाठी वापरला जातो. हे कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करते. हे जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. जे टाळूला निरोगी आणि खोल पोषण देण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला 2 चमचे दही, 2 चमचे कोरफड जेल आणि 2 चमचे मध लागेल. हे सर्व साहित्य मिसळा आणि मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत लावा. या नंतर 10 मिनिटांसाठी टाळूवर मालिश करा आणि 1 तास सोडा. थंड पाण्याने ते धुवा.

तयार करण्याची पध्दत-

हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला कोरफड जेल आणि खोबरेल तेल लागेल. प्रथम कोरफड घ्या आणि कोरफड जेल काढा. कोरफडीचा लगदा मिक्सर ग्राइंडरमध्ये ठेवा. यानंतर कोरफड काढा आणि बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये खोबरेल तेल आणि कोरफड घाला. तेल हळूहळू तपकिरी होऊ लागेल. तेल थंड होऊ द्या आणि नंतर गाळून घ्या. ते एका बाटलीत साठवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(This home remedy is beneficial for eliminating the problem of dry hair)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.