Skin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा!

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी काकडी आणि दही मदत करते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. त्यामध्येही काकडी, दही आणि गुलाब पाण्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

Skin Care : दही आणि काकडीची पेस्ट चेहऱ्याला लावा आणि तजेलदार त्वचा मिळवा!
त्वचेची काळजी

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी काकडी आणि दही मदत करते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. त्यामध्येही काकडी, दही आणि गुलाब पाण्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. विशेष करून सध्याच्या हिवाळ्याच्या हंगामात ही पेस्ट चेहऱ्याला लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते.

हा खास पॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला चार चमचे दही, तीन चमचे काकडीची बारीक पेस्ट आणि दोन चमचे गुलाब पाणी लागणार आहे. वरील सर्व साहित्य मिक्स करून चांगली पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर समान प्रमाणात लावा. 20-25 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा उपाय आपण आठ दिवसातून तीन वेळा करू शकतो. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण काकडीच्या पेस्टमध्ये मध मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासही मदत होते. मात्र, काकडीची पेस्ट ताजी असावी. ही पेस्ट आपण अर्धा तास आपल्या चेहऱ्यावर ठेवा. नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा उपाय आपण आठ दिवसातून दोन वेळा परत केला पाहिजे. हिवाळ्याच्या हंगामात आपण ही पेस्ट दररोज देखील चेहऱ्याला लावू शकतो.

दही मॉश्चरायझर म्हणून काम करते. हे आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. चेहऱ्यावरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ आणि लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्वचा पाण्याने धुवा. आपल्याला काही दिवसांतच याचा फरक दिसून येईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Published On - 12:57 pm, Sun, 5 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI