Weight Loss Diet | जलदगतीने वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम ‘डाएट प्लॅन’, लठ्ठपणामुळे असाल त्रस्त तर नक्कीच वाचा!

शरीराचा लठ्ठपणा अनेक रोगांना आमंत्रण देतो. अशा परिस्थितीत आपण गंभीर आजारांच्या विळख्यात देखील येऊ शकता. जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ल्यास वजन झपाट्याने वाढू लागते.

Weight Loss Diet | जलदगतीने वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम ‘डाएट प्लॅन’, लठ्ठपणामुळे असाल त्रस्त तर नक्कीच वाचा!
तुम्ही कधी कच्च्या खाद्यपदार्थांचा डाएट ट्राय केला आहे का? जाणून घ्या वनस्पती आधारीत पोषणाचे फायदे

मुंबई : जर तुम्हालाही वजन आणि लठ्ठपणाबद्दल चिंता वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. शरीराचा लठ्ठपणा अनेक रोगांना आमंत्रण देतो. अशा परिस्थितीत आपण गंभीर आजारांच्या विळख्यात देखील येऊ शकता. जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाल्ल्यास वजन झपाट्याने वाढू लागते. अशा परिस्थितीत, वाढते वजन नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आहारावर लक्ष केंद्रित करणे, अतिशय महत्त्वाचे आहे. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये खूप घाम गाळतात. व्यायाम देखील करतात. परंतु, आहाराकडे योग्य लक्ष न दिल्यामुळे ही सगळी मेहनत वाया जाते आणि कोणताही परिणाम दिसून येत नाही (Best weight loss diet for fastest weight loss).

तुम्ही देखील लठ्ठपणाने त्रस्त असाल, तर आम्ही आपल्याला अशा दोन आहार योजनांबद्दल माहिती देणार ​​आहोत, ज्यांचे पालन करून आपण जलदगतीने वजन कमी करू शकता.

डाएट प्लॅन 1

– सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्या.

– न्याहारीसाठी, एक ग्लास दूध आणि दोन चमचे ओट्स किंवा कॉर्नफ्लेक्स खा.

– दुपारच्या जेवणात दोन लहान वाटी भाज्यांयुक्त लापशी खा.

– संध्याकाळी चहाची तलफ वाटत असल्यास, ग्रीन टी प्या.

– रात्रीच्या जेवणामध्ये दूध आणि दलिया खा.

डाएट प्लॅन 2

– दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने करा.

– यानंतर आपण गरमा गरम ब्लॅक टी किंवा ग्रीन टी पिऊ शकता.

– न्याहारीमध्ये, आपण मोठ्या वाडग्यामध्ये सूप पिऊ शकता, ज्यामध्ये भरपूर भाज्या असाव्यात.

– दुपारच्या जेवणासाठी व्होल व्हिट ब्रेडचे दोन तुकडे खा (Best weight loss diet for fastest weight loss).

– यानंतर, आपण एखाद कप सूप पिऊ शकता.

– संध्याकाळी ग्रीन टी पिऊ शकता.

– संध्याकाळी चहा किंवा कॉफी पिणे टाळा.

– रात्रीच्या जेवणात भरपूर भाज्यांनी बनलेळे सँडविच खा.

– रात्री जेवणात वापरला जाणारा ब्रेड ओट्स किंवा व्होल व्हिट असल्यास ते अधिक चांगले होईल.

व्यायाम देखील महत्त्वाचा

या डाएट प्लॅनसह दररोज किमान 30 मिनिटांसाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. या दोन आहार योजनांचे पालन करण्यासह, आपण दररोज किमान 30 मिनिटांसाठी कोणत्याही प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत. याशिवाय न्याहारी किंवा भोजन वगळू नये, अन्यथा अशक्तपणा येऊ शकतो.

हे लक्षात ठेवा!

डाएट प्लॅन सुरु असताना हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की, सर्व लोकांचे शरीर एकसारखे नसते. या आहाराचे पालन केल्यास काही लोकांचे वजन कमी जलद गतीने कमी होईल, इतर कोणाला त्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो.

(टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Best weight loss diet for fastest weight loss)

हेही वाचा :

Running Side Effects | जास्त वेळ धावणे महिलांसाठी धोकादायक, आरोग्यास होऊ शकते हानी!

सॅल्मोन माशाचे शरीराला 10 फायदे, थायरॉईड अॅनेमिया आजारांवर गुणकारी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI