AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लिश शिकायचंय? मग दररोज 15 मिनिटे ‘हे’ टंग ट्विस्टर बोलून बना एक्स्पर्ट!

इंग्रजी शिकण्यासाठी टंग ट्विस्टर हा एक सोपा, प्रभावी आणि मजेशीर उपाय आहे. रोज फक्त १०-१५ मिनिटे टंग ट्विस्टरचा सराव केल्यास हे होतात फायदे तसेच त्यातील विविध ध्वनींचा सराव करून इंग्रजी बोलणे अधिक सहज आणि प्रवाही करता येते.

इंग्लिश शिकायचंय? मग दररोज 15 मिनिटे 'हे' टंग ट्विस्टर बोलून बना एक्स्पर्ट!
फक्त 15-20 मिनिटे 'या' टंग ट्विस्टरचा सराव करा आणि इंग्लिश बोलायला शिका!Image Credit source: freepik
| Edited By: | Updated on: Jun 15, 2025 | 3:56 PM
Share

आजकाल इंग्रजी बोलण्याची भीती अनेकांना असते. पण आता या भीतीवर मात करण्याचा एक मजेदार आणि प्रभावी मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे टंग ट्विस्टरचा सराव. केवळ १० ते १५ मिनिटे दररोज टंग ट्विस्टर बोलण्याचा सराव केला तर तुमचं उच्चार, फ्लुएंसी आणि आत्मविश्वास यामध्ये सुधारणा होऊ शकते.

टंग ट्विस्टरमुळे काय होत ?

* उच्चारात सुधारणा

टंग ट्विस्टरचा वापर केल्याने इंग्रजीमधील जटिल ध्वनी स्पष्टपणे बोलण्याची सवय लागते. उदाहरणार्थ, Peter Piper picked a peck of pickled peppers या टंग ट्विस्टरमध्ये /p/ ध्वनीवर फोकस केला जातो. सराव करताना सुरुवातीला हळू बोलून प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित केल्यास योग्य उच्चार शिकण्यास मदत होते. यासाठी आपला सराव रेकॉर्ड करून प्रगती पाहता येते.

* स्पीड आणि फ्लुएंसीमध्ये वाढ

टंग ट्विस्टरचा सराव केल्याने केवळ उच्चारच नव्हे तर बोलण्याची गती आणि सहजता देखील वाढते. उदाहरणार्थ, How much wood would a woodchuck chuck? हा टंग ट्विस्टर बोलण्याचा सराव केल्यास मेंदू आणि जिभेचा समन्वय सुधारतो. हळूहळू स्पीड वाढवत गेल्यास हकलण्याची भीती दूर होते आणि इंग्रजी सहज बोलता येऊ लागते.

* आत्मविश्वासात वाढ

टंग ट्विस्टर बोलताना सुरुवातीला चुका होतातच. पण सततचा सराव केल्याने चुका कमी होतात आणि आत्मविश्वास प्रचंड वाढतो. उदाहरणार्थ, The big dwarf only jumps असं वाक्य सरळसोपं उच्चारता आलं की, इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळतो. ह्यातून स्टेजफियरही कमी होतो. मित्रमैत्रिणींसोबत टंग ट्विस्टर कॉम्पिटिशन घेणे किंवा व्हिडिओ बनवून सराव करणे हा उत्तम पर्याय ठरतो.

* शब्दसंपत्ती आणि उच्चार सुधारतात

टंग ट्विस्टरमधील शब्दांमुळे नवीन शब्द शिकण्याची संधी मिळते. Betty bought some butter सारख्या वाक्यात ‘butter’ आणि ‘bought’ यांसारखे शब्द बोलण्याची सवय लागते. शिवाय, हे ब्रिटिश किंवा अमेरिकन लहजा शिकण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी YouTube वरील FluentU, BBC Learning English यांसारखे प्लॅटफॉर्म्स वापरता येतात.

* मेंदू व जीभ यांचा समन्वय वाढतो

टंग ट्विस्टर बोलताना जीभ, ओठ आणि मेंदू यांचा समन्वय अधिक चांगला होतो. त्यामुळे न्यूरोमस्क्युलर कंट्रोल वाढतो आणि इंग्रजी बोलताना अडथळे कमी होतात. उदाहरणार्थ, Fuzzy Wuzzy was a bear हा टंग ट्विस्टर यामध्ये उत्तम सरावासाठी मदत करतो.

सुरुवात करण्यासाठी काही सोपे टंग ट्विस्टर

१) She sells seashells by the seashore – /s/ आणि /sh/ ध्वनी सरावासाठी. २) Peter Piper picked a peck of pickled peppers – /p/ ध्वनीसाठी उत्तम. ३) How much wood would a woodchuck chuck? – /w/ आणि /ch/ ध्वनीसाठी. ४) Betty bought some butter – /b/ ध्वनीचा सराव. ५) Red lorry, yellow lorry – /r/ आणि /l/ ध्वनी सुस्पष्ट करण्यासाठी.

दररोज सराव करा!

रोज केवळ १०-१५ मिनिटांचा टंग ट्विस्टर सराव तुमच्या इंग्रजीच्या प्रवासाला गती देऊ शकतो. वेळ कमी असल्यास सकाळी १० मिनिटे आरशासमोर उभे राहून सराव करा. यामुळे जीभ आणि ओठांची हालचालही सुधारते.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.