AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits Of Lychee : उन्हाळ्यात करा लिचीचे सेवन, होतील हे आरोग्यासाठी फायदे

फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लीचीच्या झाडाचे साल, बिया, पानेही फार औषधी आहेत. (Consume lychees in summer, there will be health benefits)

Benefits Of Lychee : उन्हाळ्यात करा लिचीचे सेवन, होतील हे आरोग्यासाठी फायदे
उन्हाळ्यात करा लीचीचे सेवन, होतील हे आरोग्यासाठी फायदे
| Edited By: | Updated on: May 18, 2021 | 9:03 AM
Share

मुंबई : लीची हे एक फळ आहे. त्याची चव गोड असते. त्याचा रंग लाल आणि पांढरा असतो. त्याच्या सुगंध आणि चवीमुळे हे बर्‍याच पदार्थांमध्ये आणि कॉकटेलमध्ये वापरले जाते. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लीचीच्या झाडाचे साल, बिया, पानेही फार औषधी आहेत. लीचीच्या बियांमध्ये विषनाशक आणि वेदना निवारक गुणधर्म असतात. लीची मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. घसा दुखणे, अॅसिडीटी, पोटदुखी आदि समस्यांवर लीची गुणकारी आहे. (Consume lychees in summer, there will be health benefits)

लीचीचे फायदे

वजन कमी करण्यासाठी

लीचीमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी नसते. यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर असते. हे वजन कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे आपण वजन कमी करण्यासाठी लीची आपल्या आहारात समाविष्ट करु शकता.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

लीचीमध्ये फायटोकेमिकल्स असतात. हे अँटीऑक्सिडेंट आणि अँटीनोप्लास्टिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. डोळ्यांशी संबंधित समस्यांसाठी हे फायदेशीर आहे. हे डोळ्यांचा धूरकटपणा आणि मोतीबिंदू रोखण्यास मदत करते.

हृदय निरोगी ठेवते

लीचीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. ते हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

केस चमकदार होतात

केस चमकदार करण्यासाठी आपण लीची वापरू शकता. यासाठी लीचीची लगदा काढा आणि मॅश करा. ते 15 मिनिटांसाठी केसांवर लावा. हे केस चमकदार बनविण्यात मदत करेल.

त्वचा चमकदार करते

लीचीमध्ये व्हिटॅमिन ई असते. त्यात व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, पॉलीफेनॉल, ऑलिगोनॉल आणि इतर अँटीऑक्सिडेंट असतात. हे त्वचेचे डाग काढून टाकण्यास तसेच त्वचा सुधारण्याचे कार्य करण्यास मदत करते.

हायड्रेटेड राहण्यासाठी

लीचीमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. हे शरीरातील पाण्याची कमतरती दूर करण्यास मदत करते. उन्हाळ्यात आपण याचे सेवन करुन डिहायड्रेशनपासून स्वतःचे रक्षण करू शकता.

पचनक्रिया चांगली राहते

लीचीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने तुमची पचन क्रिया निरोगी राहते. उन्हाळ्यात, उलट्या आणि अतिसार यासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

प्रतिकारशक्ती वाढवते

लीचीमध्ये व्हिटॅमिन सी, रायबोफ्लेविन, फोलेट, नियासिन आणि बीटा कॅरोटीन असते. लीचीचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

रक्तदाब नियंत्रित करते

लिचीमध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. ते रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतात. म्हणून, लीचीचे सेवन रक्तदाब असलेल्या रुग्णांना फायदेशीर मानले जाते. (Consume lychees in summer, there will be health benefits)

इतर बातम्या

कोरोनाच्या उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं, AIIMS आणि ICMR कडून नवीन मार्गदर्शक सूचना

92 वर्षांचा लढवय्या, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी कोरोनाला हरविले

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.