Breast Cancer : स्तनाचा कर्करोग बरा करण्यासाठी करा ही योगासने, आरोग्यासाठी ठरतील लाभदायी

एकट्या भारतात प्रत्येक 20 शहरी महिलांमध्ये एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे समोर आले आहे. प्रत्येक चार मिनिटाला एका महिलेमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान होत आहे. (Do yoga to cure breast cancer, it will be beneficial for health)

Breast Cancer : स्तनाचा कर्करोग बरा करण्यासाठी करा ही योगासने, आरोग्यासाठी ठरतील लाभदायी
सर्वाधिक धोकादायक रक्ताचा कर्करोग
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 10:14 AM

मुंबई : अलीकडच्या काळात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. संपूर्ण जगभरात स्तनाचा कर्करोग आघाडीच्या तीन कर्करोगापैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, प्रत्येक वर्षात कर्करोगाची जवळपास 1.38 दशलक्ष प्रकरणे समोर येत आहेत. एकट्या भारतात प्रत्येक 20 शहरी महिलांमध्ये एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे समोर आले आहे. प्रत्येक चार मिनिटाला एका महिलेमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान होत आहे. (Do yoga to cure breast cancer, it will be beneficial for health)

कोरोनामुळे धोका वाढला

नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढण्यामागे कोरोना महामारी हे मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याव्यतिरिक्त काही प्रकरणांमध्ये लाइफस्टाईल पॅटर्न, रिप्रोडक्टिव प्रीफरेन्सेज आणि हार्मोनल असंतुलन या गोष्टी स्तनाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरल्या आहेत. सेन्टर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने कोरोना हा कर्करोगी लोकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे म्हटले आहे. कर्करोग रोखण्यासाठी किंवा लक्षणे ओळखून उपचार करणे यासाठी योग एक प्रभावी उपाय आहे. योगासनामध्ये श्वास घेण्याचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम, ध्यान तंत्र, जप यांचा समावेश आहे. योग मेंदू आणि शरीर यांचा समन्वय साधण्याचे काम करतो. याच पार्श्वभूमीवर योगासनांचे महत्व जाणून घेऊया.

योग चिकित्सा

डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या आसनांचा सराव करा. प्रशिक्षित योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली किंवा देखरेखीखाली हे व्यायाम करा.

नौकासन योग

प्रथम पाठीवर सरळ झोपा. आपले दोन्ही हात मांडीच्या पुढे असले पाहिजेत आणि आपले शरीर सरळ रेषेत असावे. आपले शरीर सैल सोडा आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. आता श्वास घेताना आपले डोके, पाय आणि संपूर्ण शरीर 30 अंशांवर वाढवा. आपले हात आपल्या मांडीच्या वरच्या बाजूला असल्याची खात्री करा. हळू हळू श्वास घ्या आणि हळू हळू श्वास सोडा. ही स्थिती आपल्या क्षमतेनुसार ठेवा. पूर्वस्थितीत येताना लांब श्वास सोडा आणि या. ही क्रिया 3 ते 5 वेळा करा. वजन कमी करण्यासाठी नौकासनाची ही पद्धत अत्यंत प्रभावी आहे.

सुखासन योग

क्रॉस लेग्ज स्थितीमध्ये पाठ ताठ ठेवून बसावे. आपले पाय आरामदायी ठेवा आणि गुडघे जमिनीवर स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. यावेळी आपले पाय आणि ओटीपोटाच्या दरम्यान एक सुरक्षित जागा असावी. ओटीपोटाचे क्षेत्र त्याच्या नैसर्गिक स्थितीतच राहिले पाहिजे. आपल्या पाठिला अशा प्रकारे समतोल करा की आपले खालचे हाड आणि प्युबिक बोन समान अंतरावर राहील. खांद्यांना ताणून ठेवा. कमरेखालचा भागही ताठ ठेवा. जोपर्यंत आपण आरामात बसू इच्छित आहात तोपर्यंत आपण या आसनात बसून राहू शकता.

सर्पासन

आपल्या पोटावर झोपा आणि आपली बोटे आपल्या पाठीमागे ठेवा. एक श्वास घेत आपले शरीर वरच्या बाजूस उचला आणि इंटरलॉक केलेले हात आपल्या पाठीमागे ठेवा. आपले पाय जमिनीपासून वर उचलू नका.

शलभासन योग

आपल्या खांद्याच्या खाली तळहातांनी पोटावर झोपा. आपले पाय एकत्र ठेवा आणि बोटे बाहेरच्या बाजूला ठेवा. श्वास घ्या आणि उजवा हात वर करा आणि डावा पाय मागे घ्या. आपले डोके व छाती वर उचलताना श्वास सोडत आपले धड खाली आणा. दुसर्‍या बाजूने अशाच प्रकारे पुनरावृत्ती करा. ही मुद्रा 10-15 सेकंदच करा. (Do yoga to cure breast cancer, it will be beneficial for health)

इतर बातम्या

बँकेनंतर सरकारी विमा कंपन्यांचे कर्मचारी संपावर जाणार, हे आहे कारण

हस्तकला आणि हातमाग निर्यात महामंडळ सरकार बंद करणार; सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार VRS

Non Stop LIVE Update
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.