ही आहे जगातील सर्वात तिखट मिरची; जाणून घ्या तिखटपणा कसा मोजला जातो?
मिरचीचा तिखटपणा कसा मोजला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुम्हालाही मसालेदार पदार्थ खायला आवडत असतील पण त्याबद्दल काहीच माहिती नसेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे.

आपल्यापैकी अनेकांना मसालेदार झणझणीत पदार्थ खायला खुप आवडतात. तसेच जेवणात तिखटपणा नसला की अनेकजण कच्च्या हिरव्या मिरचीचे सेवन करतात. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे की तुम्ही खात असलेली मिरची ऐवढी तिखट कशी असू शकते? या मिरच्याचे तिखटपण कसे ओळखता येते? मिरचीचा तिखटपणा केवळ चवीनुसारच नाही तर एका वैज्ञानिक प्रमाणानुसार देखील मोजली जाते. ज्याला आपण ‘स्कोव्हिल स्केल’ म्हणून ओळखतो.
हे स्केल एका युनिटमध्ये मिरचीचा तिखटपणा मोजते आणि मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचा घटक किती असतो हे सांगते, ज्यामुळे मिरचीच्या सेवनाने तुम्हाला तिखटपणा जाणवु लागतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, स्कोव्हिल स्केल हा एक वैज्ञानिक स्केल आहे, जे तिखट असलेल्या खाद्यपदार्थांमधील तिखटपणा मोजण्यासाठी वापरला जातात. दरम्यान मिरच्यांमधील तिखटपणा मोजण्याचे हे स्केल अमेरिकन फार्मासिस्ट विल्बर स्कोव्हिल यांनी १९१२ मध्ये विकसित केले होते. यामुळे मिरच्यांमध्ये असलेल्या कॅप्सेसिन नावाच्या घटकाच्या प्रमाणानुसार तिखटपणा मोजला जातो. चला तर मग त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मिरचीचा तिखटपणा कसा मोजला जातो?
मिरचीचा तिखटपणा मोजण्यासाठी Scoville Organoleptic Test केली जाते. यामध्ये, मिरचीचा अर्क पाण्यात मिसळला जातो आणि नंतर पॅनेलमध्ये बसलेली एक टीम किती प्रमाणात या अर्कमध्ये पाणी मिक्स करावे याची चाचणी करते. जेणेकरून त्या मिरचीचा तिखटपणा जाणवू नये. दरम्यान मिरचीच्या अर्कमध्ये जितके जास्त पाणी तितकी मिरची तिखट असते.
काही प्रसिद्ध मिरच्यांचे स्कोव्हिल रेटिंग
शिमला मिरची – 0 SHU (Scoville Heat Units)
शिमला मिरचीमध्ये तिखटपणा सौम्य असल्याने मिरची खाण्यास अजिबात तिखट लागत नाही.
जलापेनो – 3,500-8,000 SHU
जलापेनो या मिरचीमध्ये तिखटपणा मध्यम आहे. त्यामुळे ही मिरची भारतीय जेवणात खूप लोकप्रिय आहे. सर्वाधिक प्रमाणात जेवण करताना या मिरचीचा वापर करतात.
हबानेरो – 100,000 –350,000 SHU
हबानेरो ही मिरची खूप तिखट असते आणि या मिरचीचे सेवन खूप आव्हानात्मक असू शकते.
कॅरोलिना रीपर – 1,400,000–2,200,000 SHU
कॅरोलिना रीपर मिरची जगातील सर्वात तिखट मिरची मानली जाते, जी अत्यंत तिखट आहे.
पेपर एक्स – 3,180,000 SHU
पेपर एक्स ही आतापर्यंतची सर्वात तिखट मिरची असल्याचे म्हटले जाते आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद आहे.
स्पाइस टॉलरेंसला समजण्यासाठी उपयुक्त
Scoville Scale केवळ मिरचीचा तिखटपणा मोजत नाही तर कोणतीही मिरची किती प्रमाणात खावी हे देखील सांगते. जर तुम्हाला आहारात तिखट मिरची खाण्याची सवय असेल मदतीने तर स्कोव्हिल स्केल तुम्हाला कोणती मिरची तुमच्या चव आणि स्पाइस टॉलरेंसला योग्य आहे की नाही हे सांगण्यास मदत करते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा)