AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Condom in Woman lung : 27 वर्षीय शिक्षिकेला आधी टीबीचा संशय, तपासणीत फुफ्फुसात कंडोम निघाला, डॉक्टरही अवाक

फुफ्फुसाचा एक्स रे काढण्यात आला, तर त्यात चक्क कंडोम असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने डॉक्टरही अवाक झाले.

Condom in Woman lung : 27 वर्षीय शिक्षिकेला आधी टीबीचा संशय, तपासणीत फुफ्फुसात कंडोम निघाला, डॉक्टरही अवाक
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 11:07 AM
Share

मुंबई : टीबी हा आजार आजही अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरणाऱ्या आजारांपैकी एक आजार आहे. त्यामुळेच सर्वच पातळीवर याविषयी जागृकता आहे. एका महिलेच्या बाबतीतही सुरुवातीला तिला टीबी झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. मात्र, नंतर टीबीची औषधं घेऊनही फरक पडेना म्हणून फुफ्फुसाचा एक्स रे काढण्यात आला, तर त्यात चक्क कंडोम असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने डॉक्टरही अवाक झाले (Doctors found Condom in woman lung and shocked after knowing reason).

अनेक उपचार तरीही फरक नाही, डॉक्टरही चक्रावले

एका 27 वर्षीय शिक्षिकेला खूप दिवस सातत्याने सर्दी, खोकला आणि ताप असा त्रास सुरु होता. त्यावर तिने सुरुवातीला डॉक्टरांकडून लक्षणानुसार उपचारही घेतले. त्यानंतरही काहीही फरक पडला नाही. हा त्रास जवळपास 6 महिने सुरु राहिला. त्यामुळे डॉक्टरांनी कदाचित त्यांना टीबी झालेला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला. त्यानुसार गोळ्याही सुरु केल्या. मात्र, त्या औषधांनीही त्यांना फरक पडेना. डॉक्टरांनाही आजाराचे निदान होईना. टीबीची चाचणी केली तर तिही निगेटिव्ह आली. त्यानंतर डॉक्टरही चक्रावले.

महिला शिक्षिकेच्या छातीत कंडोम

अखेर डॉक्टरांनी या महिलेच्या छातीचा एक्स रे काढला. या एक्स रेमध्ये महिला शिक्षिकेच्या छातीला सूज आल्याचं लक्षात आले. सूज आलेल्या भागाची तपासणी केली असता तेथे काहीतरी अडकल्याचं लक्षात आलं. सखोल तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात हा तुकडा दुसरं तिसरं काही नसून कंडोमचा तुकडा असल्याचं स्पष्ट झालं.

कंडोम फुफ्फुसात कसं?

महिला शिक्षिकेच्या फुफ्फुसातच कंडोम सापडल्याने डॉक्टरही चक्रावले. हा कंडोम फुफ्फुसापर्यंत गेला कसा असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी संबंधित महिला शिक्षिकेला विश्वासात घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांना यामागचं कारण उलगडलं. महिला शिक्षिका आणि तिच्या पतीने लैंगिक संबंधांदरम्यान काही वेगळ्या लैंगिक क्रीडा करुन पाहिल्या. या दरम्यान, कंडोम सैल झाला आणि नकळतपणे कंडोम गिळला गेला. आपल्याकडे लैंगिक विषयांवर बोलण्याबाबत अनेक कथित टॅबू आहेत. त्यातूनच या महिला शिक्षिकेलाही आपण कंडोम गिळल्याचं सांगण्यात संकोच झाला आणि त्यांना तब्बल 6 महिने हा त्रास सहन करावा लागला. मात्र, अखेरीस हा कंडोम फुफ्फुसातून काढण्यात यश आलं.

हेही वाचा :

दिल्लीतील टॅक्सी चालक फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम का ठेवतात?

रोमान्सच्या राजधानीत कंडोमची विक्री घटली, मंदीचा फटका

कंडोम कंपन्यांकडून सरकारला कोट्यावधींचा चुना

 व्हिडीओ पाहा :

Doctors found Condom in woman lung and shocked after knowing reason

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.