AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सकाळी एक ग्लास ‘हे’ पेय प्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘रोगप्रतिकारक शक्ती’ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे.

दररोज सकाळी एक ग्लास 'हे' पेय प्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !
| Edited By: | Updated on: Apr 23, 2021 | 7:05 AM
Share

मुंबई : कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘रोगप्रतिकारक शक्ती’ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन करावे. याबाबत लोक नेहमी संभ्रमात असतात. कोरोना महामारीच्या काळात जो-तो आपल्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त आहे. (Drink turmeric, honey, salt, lemon water to boost immunity)

साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. या सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात आहेत. आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास नक्की मदत होईल. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेले साहित्य लागणार आहे.

-एक ग्लास पाणी

-हळद

-मध

-सुठ

-लिंबू

सर्वात अगोदर एक ग्लास पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवा. त्यामध्ये हळद, मध, सुठ घाला आणि चांगले उकळूद्या हे पाणी आता एका ग्लासमध्ये काढा आणि त्यात लिंबू घाला आणि प्या. हे दररोज सकाळी उपासी पोटी घ्यावे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते.

मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो. खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो.

लिंबाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा अधिक असते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घाला आणि प्या यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होती. तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असल्यास लिंबाचा रस एक रामबाण उपाय आहे. रक्त येणाऱ्या हिरड्यांवर लिंबाचा रस चोळल्यास रक्त येणे थांबते आणि यामुळे आपले दातही चांगले होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

(Drink turmeric, honey, salt, lemon water to boost immunity)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.