आल्याचा चहा पिण्याची तुम्हालाही सवय?, मग हे नक्की वाचा !

आपल्याकडे चहा प्रेमींची संख्या अतिशय जास्त आहे. काही लोकांना ‘बेड टी’ची सवय असते, तर अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा पिण्याची सवय असते.

आल्याचा चहा पिण्याची तुम्हालाही सवय?, मग हे नक्की वाचा !
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 31, 2021 | 2:56 PM

मुंबई : आपल्याकडे चहा प्रेमींची संख्या अतिशय जास्त आहे. काही लोकांना ‘बेड टी’ची सवय असते, तर अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा पिण्याची सवय असते. त्यामध्येही अदरकचा चहा पिणे खूप जणांना आवडते. असे अनेकजण असे आहेत की, त्यांना दिवसांतून 7-8 वेळा चहा घेण्याची सवय आहे. अदरकच्या चहाचे अतिसेवन शरीरासाठी घातक ठरू शकते. (Drinking too much ginger tea is harmful to health)

अदरक जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे या लोकांना चक्कर व अशक्तपणा जाणवते. जास्त प्रमाणात अदरकचा चहा पिण्यामुळे पोटात अ‍ॅसिड होते, ज्यामुळे पोटात जळजळ होते. त्याचप्रमाणे अदरकचा चहा जास्त प्रमाणात प्याल्याने झोपेची समस्या उद्भवू शकते. रात्री वेळीतर आल्याचा चहा चुकून पण पिऊ नये.

बर्‍याच लोकांना अशी सवय असते की, त्यांना खाल्ल्यानंतर लगेच चहा पिणे आवडते. परंतु यामुळे केवळ आपल्या आरोग्यास हानी पोहचते. वास्तविक, आणणा ग्रहण केल्यानंतर त्यातून शरीराला मिळणारे पोषक घटक लगेच चहा प्यायल्याने शोषल जात नाही, ज्यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. म्हणून खाण्याच्या किमान एक तासानंतर चहा प्या.

अदरकमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी-कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्त्रोत म्हणून आलं ओळखलं जातं. त्याचबरोबर मॅग्नेशिअम, फॉस्फरस, आर्यन, झिंक, कॅल्शिअम आणि बीटा कॅरेटीन मुबलक प्रमाणात असतात. तसेच आल्यात अॅन्टीफंगल, अॅन्टीबॅक्टेरिअल आणि अॅन्टीवायरल गुणधर्म भरपूर असतात. पण आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या याच आल्याच्या अतिसेवनामुळे अनेक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.

संबंधित बातम्या : 

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Drinking too much ginger tea is harmful to health)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें