AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : दूध आणि मधाचा असा करा वापर, काही मिनिटांत मिळेल चमकणारी त्वचा

दुधात लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेतील मृत पेशी काढून चेहर्‍याचे सौंदर्य वाढविण्याचे कार्य करते. मध त्वचेचे पीएच राखण्यासाठी कार्य करते. (Use milk and honey, you will get glowing skin in a few minutes)

Beauty Tips : दूध आणि मधाचा असा करा वापर, काही मिनिटांत मिळेल चमकणारी त्वचा
दूध आणि मधाचा असा करा वापर
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 13, 2021 | 8:09 AM
Share

मुंबई : उन्हाळ्यात मध आणि दुधाचा वापर त्वचेला चमकदार आणि हायड्रेटिंग ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. या दोन गोष्टी स्वयंपाकघरात सहज असतात. आपण मध आणि दुधाचा वापर करून फेस मास्क बनवू शकता जे क्लिजिंग आणि एक्सफोलिएट एजंट म्हणून कार्य करते. आपण या फेस मास्कचा वापर करुन मुरुमांच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. हे त्वचेला मॉश्चराईज करण्यासोबतच मुलायम ठेवते. दुधात लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेतील मृत पेशी काढून चेहर्‍याचे सौंदर्य वाढविण्याचे कार्य करते. मध त्वचेचे पीएच राखण्यासाठी कार्य करते. दूध आणि मध वापरून आपण त्वचा चमकत कशी ठेवू शकता ते जाणून घ्या. (Use milk and honey, you will get glowing skin in a few minutes)

मध आणि दुधाचा फेसवॉश

मध आणि दूध दोन्हीही क्लींजिंग एजंट म्हणून काम करतात आणि मुरुमांना कारणीभूत बॅक्टेरीया कमी करण्यासाठी कार्य करतात. हे त्वचेत क्लिंजरसारखे कार्य करते. यासाठी आपल्याला एक चमचे दूधात 2 चमचे मध मिसळून पेस्ट तयार करावी लागेल. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी टोनर आणि मॉइश्चरायझर वापरा.

एक्सफोलिएट फेस मास्क

दुधामध्ये कोलेजन प्रोटीन असते जे आपली त्वचा तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. मध आणि दुधात अँटी एजिंग गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा तंदुरुस्त राहण्यास मदत होते. यासाठी मध आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

फेस स्क्रब

त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी मध, दूध आणि ओट्स घालून फेस आणि बॉडी स्क्रब तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मालिश करा. मालिश केल्याने आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसेल. (Use milk and honey, you will get glowing skin in a few minutes)

इतर बातम्या

केसांच्या वाढीसाठी लाभदायी ‘एरंडेल तेल’, वाचा याचे फायदे !

केसांच्या वाढीसाठी लाभदायी ‘एरंडेल तेल’, वाचा याचे फायदे !

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली