AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटाच्या समस्यांसाठी रामबाण उपाय, तांब्याच्या भांड्यात पाणी आणि….

तुम्ही अनेक लोकांना तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिताना पाहिले असेल, विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी ते पिणे खूप फायदेशीर आहे.

पोटाच्या समस्यांसाठी रामबाण उपाय, तांब्याच्या भांड्यात पाणी आणि....
| Updated on: Mar 11, 2021 | 10:36 AM
Share

मुंबई : तुम्ही अनेक लोकांना तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिताना पाहिले असेल, विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी ते पिणे खूप फायदेशीर आहे. तांब्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण असते, दोन्ही रंग उबदार स्वरूपाचे आहेत. याशिवाय तांब्याच्या पात्रातील पाणी औषधी गुणांनी भरलेले असते.  (Drinking water from a copper pot is beneficial for health)

बदलेल्या जीवनशैलीमुळे अपचन, आंबोशी, बद्धकोष्टता, गॅस, पोटदुखीसारख्या समस्या लोकांच्या रोजच्या समस्या बनल्या आहेत. अति-मसालेदार, तेलकट अन्न आणि उशीरा खाण्याच्या सवयी यासारख्या विविध कारणांमुळे पाचन तंत्र सामान्यत: विचलित होते आणि अशा समस्या उद्भवू लागतात. जर आपणही दररोज अशा समस्यांशी झुंज देत असाल तर, या सोप्या उपायांचा आपल्याला उपयोग होऊ शकेल

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे पोटासाठी खूप फायदाशीर ठरते. जुन्या काळात लोक बर्‍याचदा ताब्यांची भांडी वापरत. पोट हे सर्व आजारांचे मूळ कारण आहे, असा जुन्या लोकांचा विश्वास होता. जर पोट निरोगी असेल तर, सर्व काही निरोगी राहते, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच आपणही तांब्याच्या भांड्यातही पाणी पिण्याची सवय लावून घेतली पाहिजे. परंतु, ही भांडे जमिनीवर ठेवू नका. तांब्याचे भांडे ठेवण्यासाठी लाकडी टेबल किंवा फळीचा वापर करा. तरच त्याचा फायदा होईल.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Drinking water from a copper pot is beneficial for health)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली