AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wheatgrass Benefits : गव्हाच्या रोपांचा रस पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

गव्हाच्या रोपांचा रस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गव्हाच्या रोपांमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात.

Wheatgrass Benefits : गव्हाच्या रोपांचा रस पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
गव्हाच्या रोपांचा रस
| Updated on: May 21, 2021 | 10:25 AM
Share

मुंबई : गव्हाच्या रोपांचा रस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गव्हाच्या रोपांमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. विशेष म्हणजे हे पेय आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतले पाहिजे. गव्हाच्या रोपांमध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायटोन्यूट्रिएंट्स, अमीनो अॅसिडस्, जीवनसत्त्वे अ, सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स, क्लोरोफिल आणि प्रथिने यासारखे पोषक घटक असतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला त्याचे फायदे जाणून घेऊया. (Drinking wheatgrass juice is beneficial for health)

गव्हाच्या रोपांचा रस घेण्याचे फायदे गव्हाच्या रोपांचा रस दररोज एकवेळ घेतला पाहिजे. याच्या एका ग्लासमुळे आपल्याला दिवसभराची ऊर्जा मिळते. विशेष करून उन्हाळ्याच्या हंगामात हा रस घेतला पाहिजे. यामुळे आपले शरीर थंड राहण्यास मदत होते. मात्र, याचे अधिक सेवन आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

त्वचेसाठी – गव्हाच्या रोपांचा रस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा वापर चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी केला जाऊ शकतो. गव्हाच्या रोपांचा रस तयार करा आणि त्यामध्ये थोडे पाणी घाला चेहऱ्याला लावा. हे चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटे लावा आणि मग चेहरा धुवा. आपण आठवड्यातून एक किंवा दोनदा हे करू शकता.

वजन कमी करण्यासाठी – गव्हाच्या रोपांचा रसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे वजन कमी करण्यात आपल्याला मदत करू शकते. हे अधिक जंक फूडची चरबी कमी करण्यास मदत करते. यासाठी आपल्याला ताज्या गव्हाच्या रोपांचा रस लागणार आहे. दररोज हा रस पिल्याने आपले वजन झटपट कमी होईल.

बद्धकोष्ठतेची समस्या रोखण्यासाठी – गव्हाच्या रोपांचा रसामध्ये फायबर आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हे चयापचय वाढवते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येस आराम मिळतो. गव्हाच्या रोपांचा पावडरमध्ये अल्कधर्मी खनिजे असतात. ते अल्सर, अतिसार आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कार्य करतात.

डिटॉक्ससाठी – गव्हाच्या रोपांचा रसामध्ये बरेच पोषक घटक असतात. ते शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकतात. त्यात क्लोरोफिल असते. हे शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करते. हे तुमचे यकृत निरोगी ठेवते. हे आपले शरीर स्वच्छ ठेवते. यामुळे, उर्जेची पातळी देखील चांगली राहते.

सांधेदुखीसाठी – थंड हवामानात बऱ्याच लोकांची गुडघेदुखीची समस्या वाढते. यासाठी आपण नियमितपणे एक ग्लास गव्हाच्या रोपांचा रस घ्यावा लागेल. यामुळे आपली गुडघेदुखीची समस्या दू राहिल.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Drinking wheatgrass juice is beneficial for health)

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.